Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी; पीक वाहून गेल्याचे पाहून शेतकऱ्याने संपवले जीवन

Dharashiv News : मागील आठवड्यापासून धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतातील पिके वाहून गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. अशाच प्रकारे अतिवृष्टीमध्ये शेतातील पीक पूर्णपणे वाहून गेल्याचे पाहून हतबल झालेल्या शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात समोर आली आहे. 

धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील म्हात्रेवाडी येथील लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. तर काहींच्या शेतात पाणी साचले असल्याने पिके सडण्याच्या स्थितीत आहे. यामुळे शेतकरी हताश झाला असून कर्ज फेड कशी करायची या चिंतेत सापडला आहे. यातून टोकाचे पाऊल उचलले जात आहे. 

Dharashiv News
Nanded : गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पुराच्या पाण्यात तरुण बुडाला

धाराशिव जिल्ह्यात पहिला बळी 

धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. यात दीड एकर जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण पवार या शेतकऱ्याने शेतात सोयाबीन आणि कांदा पिकाची लागवड केली होती. मात्र हे दोन्ही पीक अतिवृष्टी मध्ये वाहून गेल्यामुळे शेतकरी लक्ष्मण पवार हातबल झाले होते. यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलून गळफास घेत आत्महत्या केली. लक्ष्मण पवार यांच्या आत्महत्येमुळे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी गेला आहे. 

Dharashiv News
Beed Rain : गेवराई तालुक्यात ऊस पिकाचे अतोनात नुकसान; मदत वाढवून देण्याची मागणी

सीना नदीचे रौद्ररूप 

सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला आहे. आज नदीने रौद्ररूप धारण केल्याने मोहोळ तालुक्यातील नांदगाव गावाला पाण्याचा वेढा बसला आहे. यामुळे नांदगावमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी ग्रामस्थ्यांना रेस्क्यू करण्यासाठी आपदा मित्रांच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com