Iran Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा! अमेरिकेचा इराणच्या सगळ्यात मोठ्या तेल निर्यात करणाऱ्या बेटावर हल्ला

US Iran Israel War News : इराणच्या महत्त्वाच्या तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावर मोठा हवाई हल्ला झाला आहे. या घटनेमुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढला असून जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Iran Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा! अमेरिकेचा इराणच्या सगळ्यात मोठ्या तेल निर्यात करणाऱ्या बेटावर हल्ला
US Attacked Iran Kharg Island Oil TerminalSaam Tv
Published On
Summary
  • इराणच्या खार्ग बेटावर मोठा हवाई हल्ला

  • हे बेट इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र

  • ८० ते ९० टक्के इराणी तेल निर्यात याच ठिकाणावरून

  • मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता

US Attacked Iran Kharg Island Oil Terminal जगात मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्राईल युद्ध सुरु आहे. हे युद्ध दिवसेंदिवस आणखी भडकताना पाहायला मिळत आहे. दोन्हीही देशाने हार मानण्यास नकार दिला आहे. या युद्धाची झळ भारतीयांना देखील बसली आहे. मागील आठवड्यात ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणच्या मोठ्या तेलाच्या साठ्यावर हल्ला करण्यात आला. आठवडाभरानंतर पुन्हा एकदा अमेरिकेने इराणमधील खर्ग बेटावर हल्ला केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, अमेरिकेने इराणमधील सर्वात मोठ्या तेल केंद्र असलेल्या खर्ग बेटावर जोरदार हल्ला केला आहे आणि अमेरिकन नौदल लवकरच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून टँकरना एस्कॉर्ट करण्यास सुरुवात करेल.हा मध्य पूर्वेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला होता.

Iran Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा! अमेरिकेचा इराणच्या सगळ्यात मोठ्या तेल निर्यात करणाऱ्या बेटावर हल्ला
Accident News : रोजा सोडला, चहा पिण्यासाठी निघाले पण वाटेतच काळाने घातला घाला, सोलापूरमध्ये २ मित्रांचा अपघाती मृत्यू

हे छोटे बेट जगभरातील इराणच्या बहुतेक तेल निर्यातीचे स्रोत आहे. त्यामुळे, हा हल्ला केवळ लष्करी कारवाई नसून इराणच्या आर्थिक जीवनव्यवस्थेवर दबाव आणण्यासाठी हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे.

खर्ग बेट

खार्ग बेट हे पर्शियन आखातातील एक लहान बेट आहे, जे इराणच्या किनाऱ्यापासून अंदाजे २५ ते ३० किलोमीटर अंतरावर आहे. आकाराने लहान असूनही, ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे बेट इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. असे म्हटले जाते की इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी अंदाजे ८० ते ९० टक्के तेल या बेटावरून येते. हे एक मोठे तेल टर्मिनल आणि लोडिंग सुविधा आहे, जिथून कच्चे तेल टँकरमध्ये भरले जाते आणि जगभरातील विविध देशांमध्ये पाठवले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com