Yogi Adityanath Saam tv
महाराष्ट्र

Yogi Adityanath : योगींचा 'बटेंगे तो कटेंगे' अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रभावी ठरणार का? उद्या होणार योगींची सभा

Akola News : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५० हजार ७२५ मतदार आहेत. गेल्या तीस वर्षांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मात्र, या मतदारसंघात भाजपला कधीच धक्का बसला नाही

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या अकोल्यात प्रचार सभेसाठी येणार आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ योगी यांची सभा शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर सकाळी २२ वाजता प्रचार सभा असणार आहे. या सभेसाठी महायुतीतर्फे जय्यत तयारी सुरु असून ३० हजारांहून लोकांची गर्दी जमण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान दंगल झालेल्या अकोल्यामध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा संभ्रमात असलेल्या हिंदूं मतांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अकोला (Akola) पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५० हजार ७२५ मतदार आहेत. गेल्या तीस वर्षांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मात्र, या मतदारसंघात भाजपला कधीच धक्का बसला नाही. प्रत्येक निवडणुकीत भाजपचे कमळ उमलले. याआधी (Yogi Adityanath) या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री नानासाहेब वैराळे, जमनालाल गोयनका, अझहर हुसेन आणि अरुण दिवेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी केलं. तर २०१९ मध्ये दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचा २५९३ मतांनी विजयी झाला होता. त्यांच्या निधनानंतर (BJP) भाजपने नवा चेहरा दिला. माजी महापौर विजय अग्रवालांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र आता भाजपमध्ये त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे.  

भाजपच्याच दोघांची बंडखोरी 

भाजपच्या दोन नेत्यांनी या मतदारसंघात बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवली आहे.अकोला पश्चिम मतदारसंघासाठी भाजपचे माजी नगरसेवक हरीश अलीमचंदानी, भाजपचे नेते अशोक ओळंबे, माजी महापौर अश्विन हातवळणे यांच्यासह २५ जण इच्छुक होते. मात्र भाजपने सर्वांना तिकीट नाकारत विजय अग्रवाल यांना संधी दिली. त्यामुळे भाजपचे नाराज हरीश अलीमचंदानी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाला सोडचिट्टी दिली. दुसरीकडे अशोक ओळंबे यांनी भाजपमधून राजीनामा देत प्रहार पक्षात प्रवेश केला आणि परिवर्तन महाशक्ती तिसऱ्या आघाडीकडून ओळंबे रिंगणात आहे. तर ठाकरे गटाचे बंडखोर राजेश मिश्रा हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहे. मिश्रा, अलीमचंदानी, ओळंबे हे हिंदू चेहरा म्हणून पाहिला जातो. 

मतांचे विभाजन रोखण्यासाठी माघार
अकोला पश्चिम मतदारसंघात मुस्लिमांची मोठी मतदार संख्या आहे. त्यामुळं मुस्लिम मतदान निर्णायक होणार आहे. काँग्रेसकडून साजिद खान पठाण हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. माजी राज्यमंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र झिशान हुसेन हे देखील काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली. यामुळे हुसेन यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली. त्यांच्या उमेदवारीमुळे मुस्लिम मतदानात विभाजन होणार होतं. त्याचाच फायदा भाजपला होणार, अशा चर्चा रंगू लागल्या. या कारणाने झिशान हुसेन यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे मतदारसंघातील गणित बदलले आहे. मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही. बंडखोर उमेदवारांमूळे हिंदूच्या मतात मोठं विभाजन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांची उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ अकोल्यात उद्या सभा होत आहे. सातत्याने या मतदारसंघात होणाऱ्या दंगलीचा मुद्दा या सभेत गाजणार. विशेष म्हणजे मुस्लिम मतांचा विभाजन रोखण्यासाठी हुसेन यांनी माघार घेतली, आता हिंदू मतांचं होणारं विभाजन रोखण्यासाठी योगी काय बोलतात? त्यांची सभा मतदारसंघात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्वाचं असणारेय. दुसरीकडं वंचित'चा 20 हजारांचा मतांचा गठ्ठा कुणाच्या पदरात पडतो. हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT