Akola Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Akola Heavy Rain : अकोला जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; गावात नदीचे स्वरूप, पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Akola News : रात्री 3 वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत सलग पाऊस सुरु होता. यामुळे गावात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: अनेक दिवसांपासुन दडी मारलेल्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे पारस गावाला नदीचे रूप आले आहे. तर लोकांचे शेती आणि संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. तसेच पुराच्या पाण्यात मोटारसायकलसह तरुण वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उबारखेड गावात घडली आहे.  

अकोला जिल्ह्यातील पारस आणि आजूबाजूच्या पाच- सहा गावात रात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. रात्री 3 वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत सलग पाऊस सुरु होता. यामुळे गावात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात अनेकांचे संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिक घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर बाळापुरचे तहसीलदार पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पुरात बापलेक गेले वाहून 
तेल्‍हारा तालुक्‍यामध्‍ये पंचगव्‍हाण मंडळातील उबारखेड येथील मनोज नामदेव गवारगुरु व त्‍यांचा मुलगा वैभव मनोज गवारगुर हे दोघे रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतातून मोटरसायकलने घरी जात होते. यावेळी पंचगव्हाण ते निंभोरा बु. मधात फरशीवरील नाल्याला पूर आल्‍याने त्यांनी पुरातून दुचाकी टाकली. यात दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली असून यात वैभव गवारगुर याचा मृत्‍यु झाला. आज सकाळी मृतदेह मिळाला आहे.

जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद 
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्‍यातील बाळापुर व पारस मंडळामध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे तसेच मन प्रकल्‍पातुन आज सकाळी सोडण्‍यात आलेल्‍या पाण्‍याच्‍या विसर्गामुळे अकोट- देवरी- शेगाव या रस्‍त्‍यावरील वाहतूक ठप्प होती. तर लोहारा गावाजवळील मन नदीच्‍या पुलावरुन पाणी असल्‍याने हा रस्‍ता ९ वाजतापासून बंद करण्यात आला होता. रस्‍त्‍याचे दोन्‍हीकडुन उरळ पोलिस स्‍टेशनकडुन बैरीकेटींग करण्‍यात आले. पुलावरून प्रवाह कमी झाल्याने आता दुपारी १ वाजता वाहतूक सुरळीत झाली आहे.

अकोला जिल्ह्यात तालुकानिहाय पाऊस
अकोट - ४.७ मिमी
तेल्‍हारा - ९.९  मिमी
बाळापुर - ४३.५८ मिमी

पातुर - ४०.६  मिमी
अकोला - ३.०  मिमी
बार्शिटाकळी - १५.९ मिमी

मुर्तिजापुर - ७.५  मिमी 

आजचा सरासरी पाऊस - १५.३  मिमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 3 वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजानं १० वर्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

Jelly Bangles Designs: जुन्या बांगड्यांना म्हणा अलविदा, यंदाच्या फेस्टिव्हलला ट्राय करा या स्टायलिश जेली बँगल्स

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT