Fraud Case : ग्रो मोअर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरण; साई संस्थानचे ४ कर्मचारी निलंबित, संस्थानची कारवाई

Shirdi News : लोकांचे ३५० ते ४०० कोटी रुपये अडकल्याचा अंदाज आहे. विशेषतः साई संस्थान कर्मचाऱ्यांची देखील यात फसवणूक झाली आहे. यात सावळे याला यापूर्वीच अटक झाली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे
Shirdi News
Shirdi NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीत ग्रो मोअर कंपनीच्या माध्यमातून साई संस्थान कर्मचाऱ्यांसह नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकरणी कंपनीचा संचालक भूपेंद्र सावळे याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर आता या प्रकरणात साई संस्थानने देखील कारवाई केली असून सहआरोपी आणि साई संस्थानात नोकरी करणारे त्याचे वडील, भाऊसह चार जणांना निलंबित करण्यात आले आहे. 

शिर्डी येथील ग्रो मोअर कंपनीच्या माध्यमातून भूपेंद्र सावळे याने अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. या फसवणुकी संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत कारवाई बाबत माहिती दिली. लोकांचे ३५० ते ४०० कोटी रुपये अडकल्याचा अंदाज आहे. विशेषतः साई संस्थान कर्मचाऱ्यांची देखील यात फसवणूक झाली आहे. यात सावळे याला यापूर्वीच अटक झाली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. 

Shirdi News
Heavy Rain : जालना, बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक भागात पूरजन्य स्थिती, घरांमध्ये शिरले पाणी

आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी 

गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असून आरोपी असलेल्या सावळे याच्याशी संबंधित साई संस्थानमधील चार कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या नातेवाईकांची देखील चौकशी सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांनी आरोपीकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Shirdi News
Prakasha News : तापी, गोमाई नद्यांमध्ये केमिकलयुक्त हिरवे पाणी; माशांचा मृत्यू, गावात भीतीचे वातावरण

गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्याचे आवाहन 

दरम्यान सावळेचे नातेवाईक साई संस्थानचे कर्मचारी असल्याने त्यांनी भाविकांची फसवणूक केली आहे का? याचा शोध घ्यावा लागेल.  या प्रकरणी सात लोकांवर गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणाची चौकशी अधिक गतीने करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. फक्त काही तक्रारदार समोर आले असून इतर लोक पुढे येत नाहीत. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला असून आरोपी आणि नातेवाईकांच्या कॉल डिटेल्सचा तपास सुरू आहे. बदनामी पोटी अनेक गुंतवणूकदार पुढे येत नाही. त्यांनी पुढे येऊन तक्रारी द्याव्यात, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल असे विखे पाटील म्हणाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com