Akola News Saamtv
महाराष्ट्र

Akola News: भाजप नेत्यांनी मत मागण्यास येऊ नये, अकोल्यात महिलांनी लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा; नेमकं कारण काय?

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला|ता. २ फेब्रुवारी २०२४

Akola News:

राज्याच्या राजकारणात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून सभा, आरोप प्रत्यारोपांचा धडाका पाहायला मिळत आहे. अशातच अकोला शहरात नेत्यांनी मतदान मागण्यास आमच्या परिसरात येऊ नये, अशा आशयाचे बॅनर झळकलेत, ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरात लावलेला बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. अकोल्यातल्या प्रभाग क्रमांक २० मधील राहणाऱ्या महिलांनी 'बस करा विकास' असे शीर्षक देवून नेत्यांनी मतदान मागण्यास आमच्या परिसरात येऊ नये, अशा प्रकारचे होर्डिंग लावून लक्ष वेधले आहे. रिद्धी सिद्धी कॉलनी येथील रोड व सर्विस नालीच्या समस्यामुळे मागील १५ ते २० वर्षांपासून नागरिक त्रस्त आहेत.

या विरोधात आता महिलानी निषेध व्यक्त करीत ‘बस करा विकास व नेत्यानी मतदान मागण्यासाठी आमच्या परिसरात येऊ नये’ असा खरमरीत इशारा देणारे बॅनर लावून कॉलनीतील सर्व गृहिणींनी आपला रोष व्यक्त केला आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अकोल्यात ३० वर्षापासून भाजपची सत्ता आहे. आम्ही भाजपाचे मतदार आहोत. अकोल्यात खासदार आमदार व नगरसेवक भाजपाचे आहेत. तरीसुद्धा तीस वर्षापासून आम्हाला सर्विस लाईन व रोड नाही. त्यामुळे आता भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी मतदान मागण्यास आमच्या परिसरात येऊ नये, असा इशारा बॅनरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंढरपूरजवळ धावत्या शिवशाही बसला आग, प्रवाशांची धावपळ

Navratri 2024: सणा-सुदीच्या दिवसात झपाट्याने वजन वाढतंय? 'या' पद्धतीने करू शकता कंट्रोल

Kesar Panchmeva Kheer: देवी भरभरून आशीर्वाद देईल आणि प्रसन्न होईल; नैवेद्यात बनवा पंचमेवा खिर

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

IND-W vs NZ-W: हरमनप्रीतला राग अनावर; पराभवानंतर या खेळाडूंवर भडकली; सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT