Pandharpur News: अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार...; दुष्काळामुळे मंगळवेढा गावकरी आक्रमक

Mangalwedha News: मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी २४ गावातील शेतकऱ्यांची आज पाणी परिषद पाठकळ येथे पार पडली.या परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने या भागातील शेतकरी पुन्हा एकदा पाणी प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत.
Pandharpur News
Pandharpur NewsSaam TV
Published On

भरत नागणे

Mangalwedha Farmers:

मंगळवेढा तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे. येथील २४ गावे दुष्काळी भागात येतात. त्यामुळे या गावांसीठी महत्वाकांक्षी असलेल्या उपसा सिंचन योजनेसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. मागणी मान्य न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी आज घेतला आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने हा निर्णय घेतला नाही तर आम्ही राज्यपालांची भेट घेऊन या दुष्काळी भागाचा कर्नाटकमध्ये समावेश करावा अशी मागणी देखील करणार असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी जाहीर केलं आले.

Pandharpur News
Mangalvedha News : मंगळवेढा पोलिसांची मोठी कारवाई, 42 लाखांचा गुटखा जप्त; चाैघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी २४ गावातील शेतकऱ्यांची आज पाणी परिषद पाठकळ येथे पार पडली.या परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने या भागातील शेतकरी पुन्हा एकदा पाणी प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत.

२००९ सालापासून या भागातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. दुष्काळी २४ गावातील शेतीसाठी राज्य सरकारने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आहे. परंतु ही योजना फक्त कागदावरच आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने आत्तापर्यंत एक रुपयाचाही निधी मंजूर केला नाही.

त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी योजनेसाठी निधीची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेसाठी निधी मंजूर करावा अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असाही इशारा पाणी परिषदेमध्ये देण्यात आला आहे. तसेच त्या भागाचा समावेश कर्नाटक राज्यामध्ये करावा अशी विनंती यांनी राज्यपालांना भेटून करणार असल्याचे पाणी परिषदेचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी जाहीर केले आहे.

Pandharpur News
PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार? लवकरच मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com