Delhi News: राजधानी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, भाजप मुख्यालयासमोर 'आप'चे आंदोलन; तणावाची परिस्थिती

Chandigarh Mayor Election: चंदीगड महापौर निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत आम आदमी पार्टी भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आंदोलनात सहभागी होणार आहेत
AAP Protest Delhi
AAP Protest DelhiSaamtv
Published On

Delhi Politics News:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या रडारवर आहेत. कथित दारू घोटाळ्यात समन्स बजावलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होतील की नाही याबाबत शंका आहे. अशातच आता राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आज जोरदार निदर्शन करत आहेत.

देशात चंदीगड महापौर निवडणुकीची (Chandigarh Mayor Election) जोरदार चर्चा होत आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत आम आदमी पार्टी भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

आम आदमी पार्टीचे कार्यालय, भारतीय जनता पक्षाचे मुख्यालय, ईडी कार्यालयासह दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप कार्यालयाजवळ पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. एकीकडे केजरीवाल यांना ईडीचे समन्स मिळाल्याने आम आदमी पक्ष संतापला असतानाच दुसरीकडे चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपवरही संताप व्यक्त केला जात आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

AAP Protest Delhi
Prakash Ambedkar: 'वंचित' महाविकास आघाडीचा भाग नाही; प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं कोणतं कारण सांगितलं?

याबाबत बोलताना आम आदमी पार्टीचे नेते डॉ.सुशील गुप्ता म्हणाले की, 'दिल्ली पोलिसांनी मला अटक करून पंजाबी बाग पोलीस ठाण्यात आणले आहे, ते सांगत आहेत की आम्हाला वरून आदेश आहेत की तुम्हाला इथेच बसवा. यावरून भाजप आम्हाला अडचणीत आणत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने या देशात अघोषित आणीबाणी लादली आहे, जो कोणी भाजपसाठी आवाज उठवेल त्याला अटक केली जाईल. (Latest Marathi News)

AAP Protest Delhi
Maharashtra Politics: मनसेच्या आक्षेपानंतर उतरवले राष्ट्रवादीचे झेंडे, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com