उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे दौऱ्यावर येण्यापूर्वीच झेंडे लावण्याच्या वादावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज संध्याकाळी धुळ्यात मुक्कामी येत असून ते ज्या शासकीय विश्रामगृहात थांबणार आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र झेंडे लावले होते. मात्र शासकीय विश्रामगृहच्या शासकीय जागेत राजकीय पक्षाचे झेंडे लावण्यास परवानगी कशी दिली असा प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर झेंडे उपवण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे दौऱ्यावर येत असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.
मनसेतर्फे बजावण्यात आलेली प्रखर भूमिका बघता प्रशासनाने सध्या तरी हे झेंडे काढले असले तरी, ज्या अधिकाऱ्यांनी हे झेंडे लावण्यासाठी परवानगी दिली त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला संबंधित अधिकारी व प्रशासन जिम्मेदार राहील असा देखील गंभीर इशारा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यातील राजकीय नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. एकीकडे राजकीय पक्षांकडून जागावाटपासाठी बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज पक्षामधून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याचदरम्यान त्यांनी उद्यापासून कोल्हापूर मतदारसंघाचा दौरा सुरु करणार असल्याचे जाहीर केले. यावरून संभाजीराजे छत्रपती लोकसभेला कोल्हापूरमधून रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.