Ganesh Visarjan Akola x
महाराष्ट्र

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला मारहाण, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून ओढत नेलं अन्...

Akola : अकोल्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भयंकर घटना घडली. मिरवणुकीसाठी तैनात असलेल्या पोलीस दलाच्या होमगार्ड जवानाला काही तरुणांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे.

Yash Shirke

  • अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान होमगार्ड जवानाला मंडळाच्या तरुणांनी मारहाण केली.

  • तीन ते चार तरुणांनी जवानाचा कॉलर पकडून मिरवणुकीत ओढत नेत मारहाण केल्याचा आरोप.

  • घटनेनंतर होमगार्ड जवानांनी पोलिस अधीक्षकांकडे कठोर कारवाईची मागणी केली.

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ganesh Visarjan Akola : अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस दलातील एका होमगार्डला काही तरुणांनी मारहाण केल्याचा प्रकार अकोल्यात घडला आहे. या घटनेनंतर होमगार्ड दलाच्या २० ते २५ जवानांनी अधीक्षकांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील बोरगाव मंजू गावामध्ये गणेश विसर्जन मिरवणुक सुरु असताना बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस दलाच्या होमगार्डला तरुणांनी मारहाण केली. एका गणेश मंडळातील तीन ते चार तरुणांनी कॉलर पकडून मिरवणुकीत नेत मारहाण केल्याचा आरोप होमगार्ड जवानाने केला आहे.

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ड्युटीवर असताना भाराबाई गणेश उत्सव मंडळातील तीन तरुणांनी मला कॉलर पकडून मिरवणुकीत नेले आणि त्यांनी मला मारहाण केली असा आरोप होमगार्ड दीपक सयाम यांनी केला आहे. आपल्याला कोणतेही कारण नसताना मारहाण झाल्याचेही होमगार्ड जवान दीपक सयाम यांनी म्हटले आहे.

मारहाण प्रकरण झाल्यानंतर दिपक सयाम यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिला. तक्रार दाखल करत असताना संबंधित ठाण्यातील पोलीस ठाणेदाराने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असा आरोप दीपक सयाम यांनी केला आहे. यानंतर २० ते २५ होमगार्ड दलातील जवानांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Apurva Gore: आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहा

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

SCROLL FOR NEXT