Akola Crime Saam Tv
महाराष्ट्र

Akola Crime: चाकूचा धाक दाखवत १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, मध्य प्रदेश कनेक्शन उघड

Akola Police: अकोल्यात १५ वर्षीय मुलीवर चाकूचा धाक दाखवत बलात्कार करण्यात आला होता. मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी आरोपीला मध्य प्रदेशच्या इंदूरमधून अटक करण्यात आली.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

महाराष्ट्राच्या अकोल्यातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली, दुसरीकडे 'सकल हिंदू समाज' आक्रमक झाला. आज अकोल्यात मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने 'हिंदू जन आक्रोश' मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वीच अर्थातच मोर्चाआधी अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठ यश आले आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तौहिदला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे. ६ दिवसांनंतर नराधम तौहिद खान समीर खान हा अकोला पोलिसांच्या हाती लागला.

गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोल्यातील जुने शहरातील डाबकी रोड परिसरात चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी तौहिद हा गजाआड झाला आहे. त्याने १५ वर्षीय अल्पवयी मुलीला चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला होता. मुलीच्या राहत्या घरात ही घटना घडली होती. मात्र, घटनेपासून 'तो' फरार होता. पुढं आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची ४ पथकं गठीत करण्यात आली होती. तौहिदच्या नातेवाईकांचं त्याच्या मित्रांच्या राहत्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

अखेर बाहेरील राज्यात असलेल्या नातेवाईकांकडून तो कुठे आहे याची माहिती मिळाली. दरम्यान आरोपी मोबाईल वापरत नसल्याने शोध घेण्यास मोठ्या अडचणी पोलिसांसमोर उभ्या झाल्या होत्या. गुजरातमधील अहमदाबाद, पुणे, भुसावळ, नागपूर बॉर्डर, जवळपास पाच राज्यात पोलिसांनी त्याचा शोध घेतला. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे 'एपीआय गोपाल ढोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री उशिरा इंदौरमधून तौहिदला अटक केली.

पीडित मुलीवर घटनेच्या दिवसापासून अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात सलग ५ दिवस उपचार सुरू आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी, भाजपचे आमदार रणधीर सावरकर, बजरंग सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता साध्वी गायत्री याशिवाय समाज बांधवांनी रुग्णालयात जाऊन मुलीच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली होती.

दरम्यान, गणेश विसर्जनदरम्यान घडलेल्या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील संतापाची लाट उसळली. त्याचवेळी बजरंग दलचे कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला. पोलिस ठाण्यात देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. नराधम आरोपीवर कठोर करावी, अशी मागणी सर्वांकडून जोर धरू लागली. विशेष म्हणजे आरोपीला तातडीने पकडण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकारी राजेश मिश्रा यांनी थेट १ लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. तर नराधम तौहीदचे हातपाय तोडणाऱ्याला लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.

अकोल्यात घडलेल्या या दुःखद घटनाप्रकरणातील आरोपी तौहिदविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. त्याला फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा व्हावी, या प्रमुख मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आज सकाळी ११ वाजता या मोर्चाला राजेश्वर मंदिरापासून सुरूवात होणार असून जिल्हाधिकारी येथे समारोप होणार आहे. या मोर्चात हजार संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : एफडी सोडा... पोस्टाच्या 'या' योजनेत ५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल भरघोस व्याज

Maharashtra Live News Update: मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Yavatmal Court : प्रियकराच्या मदतीने आईने केली मुलाची हत्या; दोघांना जन्मठेपची शिक्षा

तक्रारदाराला बड्या नेत्यानं संपवलं, चारचाकीनं चिरडलं; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Samsung Galaxy F17 5G: कमी बजेटमध्ये मोठा धमाका! Samsung Galaxy F17 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

SCROLL FOR NEXT