
दिवाळीनिमित्त धावणार विशेष रेल्वे
नागपूर ते पुणे आणि मुंबई ते पुणेसाठी विशेष रेल्वे सेवा
दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट
सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. दिवाळीत सर्वजण आपापल्या घरी जातात. अनेकजण मुंबई,पुण्यासारख्या शहरात एकटे राहतात. त्यांना आपापल्या घरी जायचे असते. दरम्यान, सणासुदीच्या काळात हजारो लोक ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असतो. परंतु अनेकदा ट्रेनमध्ये तिकीट मिळत नाही आणि सणासुदीच्या काळात प्रायव्हेट ट्रॅव्हल्स अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावतात. त्यामुळे अनेकांच्या खिशाला फटका बसतो. दरम्यान, आता यासाठीच रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिवाळीच्या काळात अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.देशभरात हजारो स्पेशल रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रवासी नागपूर ते पुणे प्रवास करतात. नागपूरला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहेत. त्यामुळे या प्रवाशांसाठी वीकेंडला आणि सणाच्या दिवशी विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर ते पुणे (२० स्पेशल रेल्वे) (Nagpur To Pune Special Railway)
२७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०२५ या काळात दर शनिवारी नागपूर येथून 01209 विशेष सेवा सुटेल. सकाळी ११.४० वाजता ही ट्रेन सुटणार आहे.
२८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात प्रत्येक रविवारी 01210 पुणे ते नागपूर अशी विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही ट्रेन पुण्यातून १५.५० वाजता सुटणार आहे.
या दोन्ही ट्रेन उरळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, वडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर (२० स्पेशल रेल्वे सेवा)
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नागपूरसाठी विशेष रेल्वे सेवा असणार आहे. २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या काळात प्रत्येक गुरुवारी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 02139 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष १२.२५ मिनिटांनी ट्रेन सुटणार आहे.
२६ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी नागपूरवरुन मुंबईला येण्यासाठी विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे. 02140 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ही ट्रेन १३.३० मिनिटांनी सुटणार आहे.
या ट्रेन ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, वडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.