Akola : अकोला जिल्हा परिषदेचा गड राखण्याचे 'वंचित' समोर आव्हान! SaamTvNews
महाराष्ट्र

Akola : अकोला जिल्हा परिषदेचा गड राखण्याचे 'वंचित' समोर आव्हान!

जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे. सत्ताधारी पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला दहा उमेदवारांची गरज आहे. मात्र, या निवडणुकीमध्ये या पक्षाचे स्टार प्रचारक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे प्रचारासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पक्षाची पहिली निवडणूक आहे. परिणामी, या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपला गड राखण्यासाठी यशस्वी ठरेल का हा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना- राष्ट्रवादी हे एकत्र आल्याने जिल्ह्यातील समीकरण बदलतील असा विश्वास राष्ट्रवादी ने व्यक्त केलाय.

अकोल्याच्या जिल्हा परिषदेची लढाई प्रकाश आंबेडकरांसाठी राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने रद्द ठरविले आहे. त्यामुळे राज्यातील पाच जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण संवर्गात पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीने बऱ्याच वर्षांपासून आपला झेंडा रोवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वंचित बहुजन आघाडीचे आठ सदस्य रद्द ठरले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत वंचितला सत्ता राखण्यासाठी दहा सदस्य विजयी करणे आवश्यक आहे.

हे देखील पहा :

जिल्हा परिषद 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी किती उमेदवार निवडून आणेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोघे पक्ष आघाडी करून लढत आहेत. तर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र, काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. परिणामी, या चार पक्षांना टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सर्व ठिकाणी 14 उमेदवार उभे केले आहेत.

या पोटनिवडणुकीत विशेष करून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे प्रचार करायला येणार नाही आहेत. परिणामी, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपले वर्चस्व कायम ठेवेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे आहे जिल्हा परिषदेचे पक्षीय बलाबल -

२०२० मध्ये निवडूण आलेले, कमी झालेले सदस्य, विद्यमान सदस्य

भारिप-बमस २५ ०८ १७

शिवसेना १३ ०१ १२

राष्ट्रवादी ०३ ०१ ०२

कॉंग्रेस ०४ ०१ ०३

भाजप ०७ ०३ ०४

अपक्ष ०१

एकूण 53

विविध प्रयोगांतून निवडणुकांमध्ये चुरस निर्माण करण्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा हातखंडा आहे. अकोला पॅटर्न आणि सोशल इंजिनीयरिंगसारख्या प्रयोगांमधून त्यांनी विदर्भात प्रभाव निर्माण केला. त्यामुळे हाच प्रभाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कायम राहील आणि अकोला पॅटर्न म्हणून ओळख असलेला अकोला जिल्हा परिषद गड वंचित बहुजन आघाडी राखेल का हे येणाऱ्या निवडणुकीनंतर पाहायला मिळेल..!

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

Prajakta Mali Phullwanti Dance: प्राजक्ता माळी शिकवतेय स्टेप बाय स्टेप डान्स; Video पाहिलात का?

SCROLL FOR NEXT