मुंबई : उत्तर प्रदेशाताल (Uttar Pradesh) धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (ATS) ने यवतमाळहून धीरज (Yavatmal) जगताप उर्फ गोविंद राव याला अटक केली आहे. धीरज हा यवतमाळ जिल्ह्यात पटवारी सोसायटीत रहातो. उत्तरप्रदेश एटीएसने या प्रकरणात विविध राज्यातून आतापर्यंत १४ जणांना अटक (Arrest) केली आहे.
हे देखील पहा :
या प्रकरणात या पूर्वीच रामेश्वर कावडे उर्फ आदम याला यूपी एटीएसने अटक केलेली असताना. धीरज जगताप याचाही या प्रकरणात सहभाग निश्चित झाल्यानंतर एटीएसनेही कारवाई केली आहे. धीरजने १० वर्षापूर्वी धर्मांतर केले. त्यानंतर तोही या धर्मांतर (Conversion) कटात सहभागी झाला. तपासात त्याच्या मोबाइलमध्ये (Mobile) तीन Whatsapp ग्रुपही यासंबधित असल्याचे समोर आले आहे.
या व्हाट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून धीरज दोन समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज व व्हिडिओ (Video) टाकायचा. तसेच तरुणांना विविध आमीष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यासाठी परावृत्त करायचा. या कटात "इस्लामिक यूथ फाउंडेशन" या ग्रुपचाही धीरज मेंबर आहे. तरुणांना किंवा नागरिकांना मदत करत असल्याचे भासवून किंवा ब्लॅकमेल करूनही धर्मांतर करत असल्याचे समोर आले आहे.
धीरज हा या कटातील आरोपी प्रकाश कांवरे याच्यासोबत धर्मांतर करणाऱ्या तरुणांचे किंवा नागिकांचे बनावट कागदपत्रही बनवायचा. या कागदपत्रांची खरी नोंद करण्यासाठी त्याने वकिलाचीही नियुक्ती केली होती. प्रकाश आणि धीरज यांनी नोकरीचे आमीष दाखवून काही तरुणाचे धर्मांतर केल्याचा संशय यूपी एटीएसला आहे. नुकतीच धीरजला यूपी एटीएसने कानपूरहून अटक केली असून उद्या न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.