Akkalkot To Trimbakeshwar Highway Saam Tv
महाराष्ट्र

Akkalkot To Trimbakeshwar: आनंदाची बातमी! अक्कलकोट ते त्र्यंबकेश्वर फक्त ४ तासांत, नव्या महामार्गामुळे प्रवास होणार सुसाट

Akkalkot To Trimbakeshwar New Highway: अक्कलकोट आणि नाशिकच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अक्कलकोट ते नाशिक प्रवास फक्त ४ तासांचा होणार आहे. राज्यात नवा महामार्ग तयार होणार आहे.

Priya More

Summary -

  • अक्कलकोट ते त्र्यंबकेश्वर प्रवास फक्त ४ तासांत होणार.

  • नाशिक–अक्कलकोट ३७४ किमी सहा मार्गिकेचा महामार्ग.

  • चेन्नई–सूरत द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचा भाग आहे.

  • प्रवास वेळ निम्म्यापेक्षा कमी होणार.

अक्कलकोटवरून त्र्यंबकेश्वरला आणि त्र्यंबकेश्वरवरून अक्कलकोटला जाणं आता अधिक सोपं आणि वेगवान होणार आहे. कारण अक्कलकोट ते त्र्यंबकेश्वर हा प्रवास फक्त ४ तासांचा होणार आहे. राज्यात आणखी एक नवा महामार्ग तयार होणार आहे. या महामार्गामुळे अनेक शहरं जवळ येणार आहेत. चेन्नई ते सूरत द्रुतगती महामार्ग प्रकल्पातील रखडलेल्या नाशिक ते अक्कलकोट या महामार्गाचा तिढा सुटला आहे. आता बीटीओ तत्वावर हा महामार्ग बांधण्यात येणार आहे.

हा महामार्ग तयार झाल्यानंतर अक्कलकोट ते नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हा प्रवास काही तासांचाच होणार आहे. हा ३७४ किलोमीटरचा प्रवास तुम्हाला फक्त ४ तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे अक्कलकोट ते नाशिक हा प्रवास करण्यासाठी सध्या ९ तासांचा कालावधी लागतो जो निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. फक्त ४ तासांत तुम्हाला त्र्यंबकेश्वर गाठता येणार आहे. त्र्यंबकेश्वर (नाशिक) ते अक्कलकोट हा महामार्ग २ टप्प्यामध्ये तयार करण्यात येणार आहे. पहिला टप्पा नाशिक ते अहिल्यानगर १५२ किमीचा असणार आहे. तर दुसरा टप्पा अहिल्यानगर ते अक्कलकोट हा २२२ किमीचा असणार आहे.

एनएचएआय या कंपनीने १,२७१ किलो मीटर लांबीचा चेन्नई ते सूरत या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले आहे. चेन्नई ते सूरत या महामार्गामुळे अनेक शहरं आणि राज्य जवळ येणार आहेत. हा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या ६ राज्यांमधून जाणार आहे. तसंच, या महामार्गामुळे सूरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कुलबुर्गी, कुरनूल, कडप्पा आणि तिरुपती ही प्रमुख शहरं जोडली जाणार आहेत. हा महामार्ग तयार झाल्यानंतर नागरिकांना अगदी कमी तासांत वेगवान प्रवास करता येणार आहे.

चेन्नई -सूरत हा द्रुतगती महामार्ग सूरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई या दोन टप्प्यामध्ये तयार केला जाणार आहे. या दोन टप्प्यात आणखी काही टप्पे आहेत. यामधील पहिला टप्पा नाशिक- अक्कलकोट हा ३७४ किमी लांबीचा आणि सहा मार्गिकेचा महामार्ग असणार आहे. हा महामार्ग एनएचएआय कंपनी बांधणार आहे.आता या महामार्गाचे काम बीओटी तत्वावर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Council: जीएसटी बदलाचा सर्वाधिक फायदा महिलांना; या वस्तू झाल्या स्वस्त | VIDEO

Chanakya Niti: मानवाच्या या ५ गोष्टी जन्माआधीच ठरतात, त्या कधीच बदलू शकत नाहीत

New GST Rates : चैनीच्या वस्तू महागणार! ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू? सर्व यादी एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: राज्य सरकारच्या जीआरविरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन

Duty Hours Increase: कामगारांसाठी महत्वाची बातमी! कामाचे तास वाढले, यापुढे ९ ऐवजी १२ तासांची ड्युटी

SCROLL FOR NEXT