Mumbai-Goa Highway: कोकणात जाणाऱ्यांसाठी अतिमहत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर २३ ऑगस्टपासून महत्त्वाचे बदल

Mumbai-Goa Highway Traffic Change for Ganeshotsav: गणेशोत्सवात हजारो चाकरमानी कोकणात जातात. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गारील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa HighwaySaam Tv
Published On
Summary

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी

२३ ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकीच्या नियमांत बदल

जड वाहनांना मुंबई-गोवा हायवेवरुन प्रवास करण्यास बंदी

गणेशोत्सवासाठी अवघे १०-१२ दिवस उरले आहेत. गणेशोत्सवात चाकरमानी कोकणात जातात. दरम्यान, तुम्हीही कोकणात जाणार असाल तर बातमी खास तुमच्यासाठी. गणेशोत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्‍यांचा प्रवास सुखकर आणि विनाअडथळा व्‍हवा यासाठी रायगड जिल्‍हा प्रशासन उपाययोजना करणार आहे.

Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी; १० तासांपासून वाहतूक ठप्प, गावातील २०० जणांचं स्थलांतर

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकीत बदल (Mumbai-Goa Highway Traffic Rule Change)

महामार्गावर वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी 23 ऑगस्‍ट रोजी संध्‍याकाळी 6 वाजल्‍यापासून 29 ऑगस्‍ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असणार आहे. त्यानंतर 2 ते 4 सप्‍टेंबर आणि 6 ते 8 सप्‍टेंबर या कालावधीत देखील महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी असणार आहे. याबाबतचे आदेश जारी करण्‍यात आले आहेत.

याचसोबत मुंबई-गोवा महामार्गावर पोलीस मदत केन्द्र, टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल. वैद्यकीय कक्ष, रूग्‍णवाहिका सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकिय उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

चाकरमान्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. हजारो चाकरमानी दरवर्षी गणपतीत गावी जातात. परिणामी महामार्गावर खूप गर्दी होते. अशातच जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यात एखादे मोठे वाहन बंद झाले तर तासनतास एकाच जागेवर थांबावे लागते. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai-Goa Highway
Pune Ganeshotsav : ...अन्यथा आम्ही वेगळ्या मार्गाने निघू! पुण्यात विसर्जन मिरवणुकीवरून वाद; गणेश मंडळांचा ठाम पवित्रा

गणेशोत्‍सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्‍यांना सुविधा (Ganeshotsav Kokan Rule Change)

० मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंदी

० वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी

० पोलीस मदत केंद्र , टोईंग व्‍हॅन, क्रेन, वाहन दुरूस्‍ती कक्ष, वैद्यकीय कक्ष उपलब्‍ध करणार

Mumbai-Goa Highway
Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात अंगारकी चतुर्थीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, दगडूशेठ गणपती दर्शनासाठी विशेष नियोजन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com