ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या सगळीकडे गणरायाच्या गोड नावाचा गजर सुरू आहे. अशात मुंबईत अनेक मोठ्या गणपतींचे आगमन होत आहे.
दरम्यान काल मुंबईच्या गिरगावातील 'अखिल चंदनवाडी' या सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा पार पडला.
गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली होती.
अखिल चंदनवाडीचा हा गणपती गोड गणपती या नावाने प्रसिद्ध आहे.
पण या गणपतीला गोड गणपती हे नाव कसे पडले तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया.
काही वर्षांपूर्वी एका गणेश भक्ताने या गणपतीला नवस केला होता. आणि नवस पूर्ण झाल्यावर गणरायाला साखर अर्पण करण्याचा शब्द दिला.
त्या गणेश भक्ताचा नवस पूर्ण झाल्यानंतर त्याने शब्द दिल्याप्रमाणे गणरायाला साखर अर्पण केली.
यानंतर इतर गणेश भक्तांनी देखील असेच केले. पुढे ही एक प्रथा बनली.
याच प्रथेमुळे अखिल चंदनवाडीच्या गणपतीला 'गोड गणपती' असे नाव पडले.