अमर घटारे, अमरावती|ता. २ ऑक्टोबर
MLA Devendra Bhuyar Controversial Statement: सुंदर मुलगी तुमच्या माझ्या- सारख्याला भेटत नाही, ती नोकरीवाल्या मुलाला मिळते, दोन नंबरची मुलगी किराणा दुकानदाराला अन् तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याला मिळतो, असे संतापजनक विधान अमरावतीच्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. भुयार यांनी केलेल्या या वक्तव्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. 'मुलगी जर पाहायला चांगली तिला पोरगा गोरा पाहिजे, मुलगी स्मार्ट पाहिजे असेल, एक नंबर देखणी असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्याला भेट नाही, ती नोकरीवाल्या मुलाला भेटते, दोन नंबरची मुलगी पानटपरी वाल्याला, किराणा दुकानदाराला भेटते,' असे खळबळजनक विधान देवेंद्र भुयार यांनी केले.
तसेच 'तीन नंबरचा राहिलेला गाळ, हेबडली हाबडलेली मुलगी शेतकऱ्याच्या पोट्ट्याला मिळते, म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचं खरं राहिलं नाही..माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे सगळा,' अशी भाषा भुयार यांनी वापरली. एकीकडे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार लाडकी बहीण योजनेचा दणक्यात प्रचार करत असतानाच समर्थक आमदाराने केलेल्या या विधानाने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, यावरुन काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. मला आश्चर्य वाटते ज्या ठिकाणी अजित पवार यांचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो आणि त्याच ठिकाणच्या आमदारांचा महिलांकडे अपशब्द मध्ये बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं, अशा प्रकारचा महिलांचा वर्गीकरण कोणीही खपून घेणार नाही, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
देवेंद्र भुयार यांनी केलेला वाह्यापणा फक्त महिलांचा अपमान नाही तर शेतामध्ये राबणाऱ्या भूमीपुत्रांचा टिंगल उडवण्याचा प्रकार आहे. कृषीक्षेत्राला कमी लेखने, अनास्था करणे आणि शेतीसंबंधित लोकांची अवहेलना करण्याचा हा प्रकार आहे. आपण काहीही वाह्यातपणा केला, हीन वक्तव्ये केली तरी आपल्यावर कारवाई होणार नाही, याची खात्री अजित पवार गट तसेच शिंदे समर्थक आमदारांना आहे, असे म्हणत सुषमा अंधारेंनीही या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.