Ajit Pawar on Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: हे असले धंदे करायला सत्तेत आलात का? अजित पवार मुख्यमंत्री शिंदेंवर भडकले

Chandrakant Jagtap

Ajit Pawar on Eknath Shinde: वर्धापनदिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली. शेतकऱ्यांना 10 तास वीज मिळत नाही, का सारखी सारखी लाईट जाते, गुठे गुडूप होते. काय उर्जामंत्री करतात? हे सरकारचं काम नाही का असे सवाल यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केले. आता तर सोलार वैगेरेच्या माध्यमातून देखील वीज निर्मिती होतेय, त्याबाबतही ते व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाहीये असे म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले, इथून सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला गेले, तिथून गोव्याला गेले आणि परत इथे आले. पार दोन चार राज्य फिरून आले. हे असले धंदे करायला फिरून आलात का? आमच्या शेतकऱ्यांचं वाटोळं करायला फिरून आलात का? अशी टीका अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर केली.

अजित पवार म्हणाले, हे सरकार काय करतंय? मुख्यमंत्री काय करताय असे म्हटलं तर शिंदे म्हणतात तुम्ही आमच्यावर खूप टीका करतात. आहो तुम्ही नुसतीच दाढी कुरवाळत बसता, मग टीका करू नको तर काय करू? तुम्ही रिझल्ड द्या, मी तुमचं कौतुक करेन असे देखील अजित पवार म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

अजित पवार म्हणाले, काही ना काही प्रकारे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळे आरोप झाले, त्यात काही तथ्य निघालं नाही. पण त्यातून आपल्याला बदनामी सहन करावी लागली. मध्यंतरी पवार साहेब छत्रपती संभाजीनगरमध्ये जे बोलले नाही, ते वाक्य त्याच्या तोंडू घालून महत्त्वाच्या चॅनलने बातमी चालवली. खातरजमाही केली जात नाही. हा देखील व्यापक कटाचा भाग नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केला. (Latest Political News)

ते म्हणाले, पवार साहेबांवर झालेला कोणत्याही प्रकारचा हल्ला अगदी शाब्दिक का होईना, राष्ट्रावादी काँग्रेस सहन करणार नाही, हा इशारा देखील मी यानिमित्ताने देत आहे. एखाद्या मुद्द्यात तथ्य नसेल आणि कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी केली जात असेल, पक्षाची प्रतिमा मलिन केली जात असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असे देखील अजित पवार म्हणाले. (Latest Marathi News)

येथे पाहा व्हिडिओ....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT