Ajit Pawar Speech: आपण एकट्याच्या ताकदीवर राज्यात सत्ता आणू शकतो? वर्धापनदिन सोहळ्यात अजित पवारांचं विधान

NCP Vardhapan Din Sohala: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन सोहळा भाषण मुद्दे
Ajit Pawar Speech
Ajit Pawar Speechsaam tv
Published On

Ajit Pawar Speech In NCP Vardhapan Din Sohala: राष्ट्रवादी पक्षाने आज 25व्या वर्षात पदार्पण केले आहे. पण आपल्याला आत्मचिंतनाची गरज आहे. आपण एकट्याच्या ताकदीवर राज्यात सत्ता आणू शकतो का? असा सवाल अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.

अजित पवार म्हणाले, २५ वर्ष माझ्या मनाला दुःख आहे. ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम बंगाल घेऊ शकतात, केजरीवाल दोन राज्य आणतात, बीआरएस एकट्याच्या बळावर सत्ता आणते मग या सर्वांत तर पवार साहेब उजवे नेते आहेत ना? आपल्याला आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आपण कुठे कमी पडलो याचा विचार केला पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Speech
Thackeray Family Security : ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅनही काढून घेतल्या; शिंदे सरकारचा निर्णय

अजित पवार म्हणाले, आपल्या राज्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आपले सहकारी वारी आपल्या दारी उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ग्रंथ वितरित करणार आहेत. देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वास्तविक संविधानाने सर्वधर्म समभाव स्वीकारला आहे आणि तो वारकरी संप्रदयाचा मुळ गाभा आहे. सर्व वारकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा. त्याळे समाजाचं प्रबोधन होईल आणि सामाजिक शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, गेल्या दोन तीन महिण्यात राज्यात आठ-दहा दंगली का घडल्या. हे का वेगवेगळ्या भागात घडत आहे. यामधून जातिय सलोखा बिघडावा, जातीजातीत, समाजासमाज्यात तेढ निर्माण व्हावी असा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यामगे मास्टरमाईंड कोण आहे हे देखील शोधून काढलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

Ajit Pawar Speech
Maharashtra Political News: पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; अमोल कोल्हे, मुंडेंनी सांगितली महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा

"जातीय सलोखा बिघडवण्यासाठी प्रयत्न होत आहे"

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, गेल्या दोन तीन महिण्यात राज्यात आठ-दहा दंगली का घडल्या. हे का वेगवेगळ्या भागात घडत आहे. यामधून राज्यातील जातीय सलोखा बिघडावा, जातीजातीत, समाजासमाज्यात तेढ निर्माण व्हावी असा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यामगे मास्टरमाईंड कोण आहे हे देखील शोधून काढलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. (Latest Political News)

"गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार कमी पडतंय"

महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत, नाशिक-पुण्यात गुंड वाहनं फोडत आहेत, कुठे आत्महत्याच्या घटना घडत आहेत, या घटना सातत्त्याने का घडतात? आपलं पोलिस खातं सक्षम आहे, परंतु राज्य सरकार कमी पडतंय असा आरोप देखील यावेळी बोलताना अजित पवार यांनी केला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com