Maharashtra Political News: पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; अमोल कोल्हे, मुंडेंनी सांगितली महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा

'महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असला पाहिजे. त्यासाठी कंबर कसली पाहिजे, असं म्हणत अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा सांगितली.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam tv
Published On

Mumbai News: आगामी निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असला पाहिजे. त्यासाठी कंबर कसली पाहिजे, असं म्हणत अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा सांगितली. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीने पक्षाच्या स्थापनेचा रौप्य महोत्सव समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.

या कार्यक्रमात अमोल कोल्हे म्हणाले, 'चहा पीत होतो, थोडा उशीर झाला आहे. आजकाल चहा वेगळा असतो. जेव्हा २५ वय येते, तेव्हा कुटुंबात त्या मुलाला सांगतात. आता जबाबदारी वाढली आहे. आता अनेक जण असेच फिरतात की हिदुंत्वाचे ठेका घेऊन फिरतात. आता वारी सुरू आहे. खरं तर तुकोबा महाराज, स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व आहे. पण ठेका दुसरे घेऊन फिरत आहे'.

Maharashtra Political News
Political News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती; विरोधकांना शह देण्यासाठी आखला मास्टर प्लान

'व्हाट्सअॅप विद्यापीठातील माणूस विचारतो, आयटी क्षेत्रात शरद पवारांनी काय केले? त्याला सांगावे लागेल तुम्हाला नोकरी मिळाली, त्याचा पाया पवारांनी यांनी घातला आहे. आता ट्विट येईल, राष्ट्रीय पक्ष होऊन दाखवा. त्यांना सांगा वाघ दोन पावलं मागे, झेप घेण्यासाठी येतो.आज झेप घेण्याचा निश्चय करायचा आहे'.

'महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी असला पाहिजे, त्यासाठी कंबर कसली पाहिजे. त्यासाठी अनेक अडथळे येतील. हिंदुत्वाची गोळी घेऊन आले, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आरसा दाखवा, असे कोल्हे म्हणाले.

Maharashtra Political News
Satara APMC News : उदयनराजेंना तिथं प्लॉटिंग करायचे आहे...,शिवेंद्रराजेंना संस्थांचे पैसे खाणं अंगवळणी पडलय; राड्यानंतर राजेंचे आराेप-प्रत्याराेप (पाहा व्हिडिओ)

धनंजय मुंडे यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. धनंजय मुंडे म्हणाले, 'महागाई आणि बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला सोडून आता यांनी समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या हिंदुत्वाची अफूची गोळी दिली जात आहे. यांना असे वाटतं की यांनीच हिंदुत्वाचा ठेका घेतला आहे. अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णद्धारासाठी मोठा निधी दिला होता. पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असला पाहिजे, असे मुंडे म्हणाले. (Maharashtra Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com