प्रमोद जगताप, साम टीव्ही
Lok Sabha Election 2024 BJP Strategy: कर्नाटक विभानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने भाजप सावध झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये अशी परिस्थिती होऊ नये म्हणून भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच लोकसभा २०२४ निवडणुकीत विरोधकांना शह देण्यासाठी आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मास्टर प्लान आखला आहे. (Latest Marathi News)
मुस्लिम, ख्रिश्चन बहुल भागामध्ये भाजपकडून अल्पसंख्यांक उमेदवार निवडणूक लढवणार आहे. देशातील १५ राज्यांमधील ६६ लोकसभा मतदारसंघात उमेदवार भाजप अल्पसंख्यांक उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे.
यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambjhajinagar) आणि भिवंडी येथील लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भाजपच अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी ही माहिती दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या मतदारसंघात ३० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पसंख्यांक आहे, त्याच मतदारसंघात भाजपकडून (Lok Sabha Election) हे उमेदवार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील १३, बिहार मधील ४, केरळ मधील ८, महाराष्ट्रातील २, गोव्यातील २ लोकसभा मतदारसंघात भाजपा अल्पसंख्यांक उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक लढवलेल्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघाचाही यामध्ये समावेश आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. यासाठी भाजपचे आमदार, खासदार यांना कामगार, महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.
तुम्ही परिस्थितीनुसार स्वत:ला बदलायला हवं. आणि तुम्ही स्वत:ला बदललं नाहीत तर सध्याच्या शर्यतीत तुम्ही मागे राहाल, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना दिला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.