Sharad Pawar Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

NCP Merger: अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल, मगच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, शरद पवारांच्या आमदारांचं मोठं विधान

NCP merger latest news : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायच्या आधी अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडायला हवं, असा ठाम दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

भरत नागणे, पंढरपूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Ajit Pawar Sharad Pawar reunion : जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार नाहीत असा मोठा दावा केला आहे. एकत्र येण्यापूर्वी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल. अन्यथा बिर्याणीत गुळवणी ओतल्या सारखा प्रकार होईल. अजित पवार यांच्या पक्षाकडे कोणताही विचार नसल्याची टीका ही आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे. आमदार जानकर यांच्या विधानामुळे सोलापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या आमदारांमध्येच मत भिन्नता असल्याचे समोर आले आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित येतील असं मला वाटतं नाही. सध्या अजित पवार सत्तेसोबत आहेत आणि शरद पवार यांची विचार धारा वेगळी आहे. त्यामुळे बिर्याणीमध्ये गुळवणी टाकल्याचा प्रकार होईल. एकत्र येण्यापूर्वी अजित पवार यांना कुठला तरी एक निर्णय घ्यावा लागेल. नसेल तर सत्तेतून बाहेर तरी पडावं लागेल, असे जानकर म्हणाले.

शरद पवार यांचा जो विचार आहे तो आम्ही पुढे घेऊन निघालोय. एकत्र यायचं असेल तर अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल नसेल तर पवार साहेबांच्या विचाराने पुढं जावं लागेल. धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही. भाजप आणि शिवसेनेकडे हिंदुत्वाचा विचार आहे. शरद पवारांचा पुरोगामी विचार आहे. असं कोणतंही धोरण आणि व्हिजन सध्यातरी अजित पवार यांच्याकडे नसल्याने एकत्र येतील असं वाटत नाही, असे जानकर म्हणाले. ईव्हीएमची तपासणी करू,डिस्प्ले दिला नाही किंवा प्रोग्राम दाखवला नाही तर सोलापूर जिल्ह्यात कुठं ही निवडणूका होऊ देणार नाही‌, असा इशारा ही आमदार जानकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : केळी सतत काळी पडून खराब होतात? मग 'या' टिप्स वापरुन बघा

Variche Appe Recipe: सोमवारचा उपवास आहे? मग १० मिनिटांत बनवा मऊ आणि लुसलुशीत 'वरीचे अप्पे'

Maharashtra Live News Update: अजित पवार घेणार पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक

Famous Actress Wedding : लग्नघटिका समीप आली! हळद लागली, मेहंदी रंगली; प्रसिद्ध अभिनेत्रीची लगीनघाई - PHOTOS

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे १९१०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT