

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी
Ajit Pawar latest political setback : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागताच अजित पवारांना भाजपन जोरदार धक्का दिला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय. मावळच्या जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले इंदुरी वराळे गटातील इच्छुक उमेदवार मेघा भागवत आणि प्रशांत भागवत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत उमेदवारीच्या राजकारणाने पेठ घेतला आहे. त्यातच हा राजीनामा राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. गेल्या काही महिन्यापासून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून प्रशांत भागवत यांनी जोरदार तयारी केली होती. गटातटात बैठका कार्यकर्त्यांशी संवाद लोक संपर्क वाढविणे सामाजिक उपक्रमातून मोठे मोठे कार्यक्रम घेणे असे सर्व स्तरावर त्यांनी काम सुरू केले होते.
इंदुरी वराळे गटासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा सुटल्याने त्यांच्या पत्नी सौ मेघा प्रशांत भागवत यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा संघटनात्मक कामाचा अनुभव आणि सामाजिक काम या सगळ्या बाबी असूनही पक्षाने मेघाताई भागवत यांना उमेदवारी नाकारली आणि तेथूनच उद्रेक झाला. आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना झोपते माप देण्यात आले. हा केवळ आमचा नव्हे तर प्रत्येक कष्टाळू कार्यकर्त्यांचा अपमान आहे अशी थेट आणि जळजळीत प्रतिक्रिया देत प्रशांत भागवत यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी स्वतः तसेच पत्नीस मेगा प्रशांत भागवत यांनीही पक्षातील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.