The final moments of the aircraft reportedly carrying Deputy CM Ajit Pawar, captured on mobile by 11-year-old Nisha Khomane in Baramati. Saam Tv
महाराष्ट्र

आवाज भयंकर येत होता म्हणून...अजित पवारांच्या विमानाचा शेवटचा व्हिडिओ ११ वर्षांच्या मुलीनं मोबाइलमध्ये केला कैद

Ajit Pawar Plane Crash Video Recorded By 11 Year Old Girl: बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन. ११ वर्षांच्या मुलीने मोबाईलमध्ये कैद केला विमानाचा शेवटचा व्हिडिओ.

Omkar Sonawane

राज्याला हादरवणारी घटना आज घडली. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी बारामतीला निघाले होते. बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर लॅंडींगच्यावेळी विमानाचा अपघात झाला.

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक हे सगळे सोबत होते. या सगळ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याने राज्यात शोककळा पसरली आहे.

बारामतीकडे जात असलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या विमानाच्या अखेरच्या क्षणांचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ जळगाव सुपे येथील निशा सचिन खोमणे या अवघ्या ११ वर्षांच्या मुलीने आपल्या मोबाईलमध्ये टिपल्याची माहिती मिळत आहे.

निशा ही आपल्या घरी असताना अचानक वर आकाशात विमान गिरट्या घालत असल्याचा मोठा आवाज ऐकू आला. सतत घिरट्या घालत असलेले विमान पाहून ती घराबाहेर आली. त्यावेळी तिने मोबाईल कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रसंग रेकॉर्ड केला. काही वेळातच या विमानाचा अपघात झाल्याची बातमी समोर आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अपघाताच्या आधीच्या क्षणांचे दृश्य असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित विमानात अजित पवार असल्याचेही सांगितले जात आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक मैदानात ठेवणार

Ajit Pawar Death: पायलटचा ट्रॉफिक कंट्रोलला कॉल अन्...; अजित पवारांच्या विमान अपघातापूर्वी काय झालं?

Gold Price Today: आजही सोनं महागलं, १.६० लाखांच्या पार पोहोचलं; वाचा 22k, 22k गोल्डची किंमत

अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देणारं दृश्य, माळरानावर पडलेले कागद अन् फाइल्स

Maharashtra Live News Update: बारामतीच्या विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे , दादा भुसे, शिवेंद्रराजे भोसले, आमदार राहुल कुल, रणजीतसिंह नाईक निंबाळकर दाखल

SCROLL FOR NEXT