मुलगा सकाळी सकाळी घरातून बाहेर पडला, टीव्हीवर विमान अपघातात मृत्यूची बातमी बघितली अन् आईच्या अश्रूंचा बांध फुटला

PSO Vidip Jadhav Died While On Duty In Plane Crash: मुंबईहून बारामतीला जात असताना झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे PSO विदीप जाधव यांचा कर्तव्यावर असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला.
Grief-stricken relatives mourn the loss of police constable Vidip Jadhav, who died on duty in a tragic plane crash.
Grief-stricken relatives mourn the loss of police constable Vidip Jadhav, who died on duty in a tragic plane crash.Saam Tv
Published On

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. ते मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी जात असताना त्यांचे विमान कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्य हे शोकसागरात बुडाले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCI) दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे.

Grief-stricken relatives mourn the loss of police constable Vidip Jadhav, who died on duty in a tragic plane crash.
Ajit Pawar Plane Crash: ८.४६ मिनिटं.. अचानक मोठा स्फोट, आगीच्या ज्वाळा...विमान कोसळतानाचा CCTV व्हिडिओ समोर

DCM अजित पवार यांचे PSO असलेल्या पोलीस शिपायाचा विमान अपघातात मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे PSO म्हणून कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलीस दलातील 2009 बॅचचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचा आज सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. कर्तव्यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. विदिप जाधव हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित होते.

Grief-stricken relatives mourn the loss of police constable Vidip Jadhav, who died on duty in a tragic plane crash.
Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला? विमान कंपनीने सांगितलं खरं कारण

त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर तसेच सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. पोलीस दलाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विदीप जाधव यांचे कुटुंब सकाळीच बारामतीकडे गेले. चाळीत राहणाऱ्या अनेकांनी आज सकाळी विदीप यांना कामावर जाताना बघितले होते.

Grief-stricken relatives mourn the loss of police constable Vidip Jadhav, who died on duty in a tragic plane crash.
Ajit Pawar Death: मी दिलदार मित्र गमावला, राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर: मुख्यमंत्री

विदीप जाधव यांच्या मृत्यूची बातमी सकाळी टीव्हीवर बघताच त्यांच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला आणि टाहो फोडला. त्यावेळी आजूबाजूचे लोक जमा झाले. थोड्या वेळानंतर पोलीस घरी आले आणि त्यांच्या आई आणि मुलाला बारामतीला घेऊन गेले. त्यांची बायको कालच पनवेलला माहेरी गेली होती. विदीप यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असं कुटुंब आहे. त्यांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ होता.नेहमी मदतीला धावणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख होती, असं शेजारी सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com