Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सूरज चव्हाण यांना लातूरमधील राडा भोवला, अजित पवारांकडून मोठी कारवाई

Ajit Pawar : लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर अजित पवारांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांना त्वरित राजीनाम्याचे आदेश दिले आहेत. विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीमुळे राज्यभर छावा संघटना आक्रमक झाली आहे.

Alisha Khedekar

लातूरमध्ये काल छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकल्याच्या आरोपावरून काल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना जबर मारहाण झाली. या मारहाणीत विजयकुमार घाडगे जबरदस्त जखमी झाले. या मारहाणीनंतर राज्यभरातील छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिंमडळात रमी खेळताना व्हिडीओ समोर आला. या व्हिडिओनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर पत्ते फेकण्यात आले. तसेच "हे घ्या पत्ते आणि मंत्र्यांना तुमच्या घरी पत्ते खेळायला सांगा", असे म्हणत कोकाटेंचा निषेध केला. याच घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.

या घटनेनंतर राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करून विजयकुमार घाडगे यांची माफी मागायला सांगा अशी मागणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. दरम्यान या मारहाणी प्रकरणी सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. असे असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार ?

लातूरमध्ये काल झालेल्या मराहणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणाले, "काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे.

माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या. काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT