Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या KYC वर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, सरकारचा पैसा...

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे गरजेचे आहे. दरम्यान, केवायसी करणे अनिवार्य का आहे याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य

केवायसी करणे काय गरजेचे? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करण्याची दोन महिन्याची मुदत

लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचा लाभ बंद केला जाईल. दरम्यान, या योजनेत ई केवायसी करण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली आहे. तुम्ही या कालावधीत केवायसी केली नाही तर तुम्हाला अडचण येऊ शकते. या योजनेच्या केवायसीबाबत आता अजित पवारांनी महत्त्वीची प्रतिक्रिया केली आहे.

अजित पवार नक्की काय म्हणाले? (Ajit Pawar On Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य का केली?याबाबत अजित पवारांनी स्वतः माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी आता चार-पाच जिल्ह्यांचा दौरा केला आहे. तेव्हा मी लाडक्या बहि‍णींना विचारले तेव्हा अनेक महिलांनी केवायसी केली आहे. कुठेतरी हा पैसा सरकारचा, जनतेल आहे. हा पैसा चुकीच्या पद्धतीने जाऊ नये. ज्या खरंच लाभार्थी आहे त्यांच्याच खात्यात पैसे जावे, म्हणून या गोष्टींचा वापर करण्यात येत आहे. आता काही जण मयत असतात, पण त्यांची नावं कमी केलेली नसतात, अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे ई केवायसी केलेली आहे. देशात सगळीकडेच ई केवायसी सुरु आहे. याबाबत नागरिकांमध्ये जागृती झालेली आहे. याबाबत अजित पवारांनी माहिती दिली आहे.

ई केवायसी कशी करावी? (Ladki Bahin Yojana E KYC Process)

तुम्हाला सर्वात आधी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यामध्ये तुम्हाला तुमची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची आहे.

यामध्ये तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला याचा समावेश आहे.

यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. त्याआधी कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT