Ajit Pawar On Jitendra Awhad Saam Digital
महाराष्ट्र

Ajit Pawar On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या महाडमधील कृतीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Ajit Pawar News : जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करताना त्यांच्या हातून चुकून बाबासाहेब आंबेडकरांच पोस्टर फाडलं गेलं. त्यावर अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली.

Sandeep Gawade

देशातील महापुरुषांबद्दल प्रत्येकाला आदर असतो त्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. त्यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत त्याची काळजीही प्रत्येकाने घेतली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं यावेळी बाबासाहेब आंबडेकरांचे फोटो चुकून फाडले गेले. त्यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करणार असल्याची चर्चा आहे. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र विरोध दर्शवला असून आज त्यांनी माहडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन केलं. त्यावळे बाबासाहेब आंबेडकारांचे फोटो चुकून फाडण्यात आले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आव्हाड यांनी त्यावरून जाहीर माफी ही मागितली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एक गुन्हा बौद्ध धर्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे. तर दूसरा गुन्हा जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस अधिक तपास करीत असून या गुन्ह्यांमुळे आव्हाड यांच्या आडचणीत वाढ झाली आहे.

पुण्याच्या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप होणार नाही

यामध्ये सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न होता जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. ज्या मुलांनी तो अपघात घडवला तोही आतमध्ये आहे. त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आलं आहे. कायद्याने आणि नियमाने जी चौकशी व्हायला हवी ती सुरू आहे.

जे कोणी दोषी असतील किंवा त्यामध्ये अजित पवार यांच्यासारखी व्यक्ती देखील दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई होईल. त्या प्रकरणात माझी नार्कोटेस्ट ची तयारी आहे. पण मी जर नार्कोटेस्टमध्ये क्लिअर निघालो तर अंजली दमानिया यांनी परत तुमच्यासमोर यायचं नाही घरी बसून संन्यास घ्यायचा, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धमकीचा कॉल; रेल्वेगाडी बॉम्बने उडवून टाकू!

Independence Day : स्वातंत्र्य दिनाला फ्री पिझ्झा? दर तासाला 75 पिझ्झा फ्री मिळणार?

President Droupadi Murmu: संविधान, लोकशाही....ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींच्या संबोधनातील ठळक मुद्दे

Ladki Bahin Yojana : लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ, संभाजीनगरात तब्बल 84 हजार अर्ज; हजारो लाडकींचे अर्ज रडारवर

Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT