Sangli News
Sangli NewsSaam Digital

Sangli News : जत माजी नगरसेवक खून प्रकरण; दीड वर्षांपासून फरार भाजपच्या माजी नगरसेवकाला अखेर अटक

Sangli Crime News : सांगलीच्या जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील संशयित आरोपी भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत अखेर न्यायालयात हजर झाले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून उमेश सावंत फरार होते.
Published on

विजय पाटील

सांगलीच्या जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील संशयित आरोपी भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत अखेर न्यायालयात हजर झाले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून उमेश सावंत फरार होते. सांगली पोलिसांच्याकडून उमेश सावंत याला फरार घोषित करून बक्षीस देखील जाहीर केलं होते.

तब्बल दीड वर्षांनंतर सावंत सांगली न्यायालयात स्वतःहून हजर झाले आहेत. यानंतर सांगली पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी करून अटक केली आहे. जत शहरात भर दिवसा भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या गाडीवर हल्ला करत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.भाजपाचे माजी नगरसेवक उमेश सावंत यांनी वैयक्तिक वादातून सुपारी देऊन विजय ताड यांची हत्या केल्याचे समोर आलं होतं. या प्रकरणी जत पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती,मात्र उमेश सावंत हे फरार होते.

Sangli News
Beed Crime : दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, बीडमध्ये युवकास अटक; 6 लाख 60 हजार रुपयांच्या 10 दुचाकी जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com