Babajani Durrani Joined Sharad Pawar Group Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: विधानसभेआधी दादांना मोठा धक्का, बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

Tanmay Tillu

परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत दादांना धक्का दिलाय. मात्र यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दुर्राणींनी खास अंदाजात प्रतिक्रिया दिलीये.

तर प्रफुल्ल पटेलांनी दुर्राणींच्या नाराजीचं कारण सांगितलं. तिकीट न दिल्यानं दुर्राणींनी पक्ष सोडला, असं ते म्हणाले. यावर बाबाजानी दुर्राणी यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटलं की, ''कोणतीही मजबुरी नाही, साहेबांसोबत मी आधीपासूनच आहे.''

कोण आहेत बाबाजानी दुर्राणी?

बाबाजानी दुर्राणी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांकडून विधान परिषदेवर आमदारकी त्यांना देण्यात आली. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दुर्राणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाथरीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. तिकीट वाटपातल्या नाराजीनंतर पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतेल आहेत. लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बरीच चलबिचल पाहायला मिळाली.आत्तापर्यंत कोणीकोणी दादांची साथ सोडली ते जाणून घेऊ...

दादांच्या राष्ट्रवादीला गळती

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणेंचाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर पिंपरी-चिंचवडचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोरांची सोडचिठ्ठी दिली.

ऐन विधानसभा निवडणुकांआधी अजित दादांना धक्क्यावर धक्के बसतायत...एकीकडे राष्ट्रवादीला गळती लागलीये तर दुसरीकडे महायुतीच्या सुमार कामगिरीचं खापरही दादांवर फोडलं जातंय. त्यामुळे अजित दादांसाठी विधानसभेची वाट दिवसेंदिवस अधिक खडतर होतेय. सगळ्याचं आघाड्यावर दादांची कसोटी लागणार एवढं नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT