Ajit Pawar Explainer saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Explainer: कुणाची गुगली, कुणाची विकेट आणि चाणक्य कोण?

Ajit Pawar Support Shinde Fadnavis Government: अजित पवारांनी हे बंड का केलं आणि या बंडामागील चाणक्य नेमकं कोण? अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे.

Chandrakant Jagtap

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षात अनेक अशा काही घडामोडी घडल्या ज्याने संपूर्ण राजकारण ढवळून निघालंय. आता आज अजित पवारांनी आम्हीच राष्ट्रवादी असल्याचे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे पुन्हा एकदा राज्याचं राजकारण नेमकं चाललं कुठे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवारांनी हे बंड का केलं आणि या बंडामागील चाणक्य नेमकं कोण? अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे.

अजित पवारांनी निर्णय का घेतला?

राज्यात विकासाचं राजकारण करायचं असेल तर केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच हा निर्णय असल्याचेही अजित पवार म्हणाले. परंतु शरद पवारांनी ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नाही असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांनी आमच्या पक्षातील लोकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यातील काही लोकांनी आज शपथ घेतली, असे देखील पवार म्हणाले.

पक्षातील नेत्यांना सुरक्षित करण्यासाठी निर्णय?

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडी कारवाईची टांगती तलवार होती. यात स्वत: अजित पवारांचा देखील समावेश होता. त्यातीलच काही लोकांनी आज शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनाच या बंडाचं श्रेय दिलं पाहिजे असं म्हटलं आहे. त्यामुळे एक प्रकारे पक्षातील नेत्यांना सुरक्षित करण्यासाठी अजित पवारांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजकीय भूकंपामागील चाणक्य कोण?

दोनच दिवसांपूर्वी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून गुगली आणि विकेट अशी जुगलबंदी रंगली होती. त्यानंतर आता नेमकी कुणी गुगली टाकली आणि कुणाची विकेट गेली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रगंली आहे. 2019 ला पवारांनी टाकलेल्या गुगलीवर फडणवीसांची विकेट गेली अशी चर्चा रंगली होती. कारण तेव्हा साडेतीन दिवसांच्या सरकारमध्ये अजित पवार यांना 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात क्लिन चिट मिळाली होती.

त्यानतंर राजकारणाच्या पाडद्याच्या मागे पडलेले हे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा उकरून काढले आणि या आरोपांच्या काही दिवसानंतरच अजित दादांनी पुन्हा भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पहाटेचा शपथविधी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या समर्थनानेच घेतला होता असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. शरद पवारांशी चर्चा करूनच शपथ घेतल्याचे फडणवीस म्हणाले होते. परवा पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील शरद पवार यांनी फडणवीसांसोबत चर्चा सुरू होती. परंतु दोन दिवस आधी भूमिका बदलल्याचे मान्य केले होते.

तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये झालेला पाहाटेचा शपथविधी, त्यानंतर त्याविषयी फडणवीसांनी केलेले गौप्यस्फोट, आता अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय, त्यांना पक्षातील असलेल्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आणि आजच्या शपथविधीनंतर पक्षात एवढं मोठं बंड होऊनही शरद पवार यांनी अजित पवारांवर कारवाईबाबत कठोरपणे न घेतलेली भूमिका यामुळे या राजकीय भूकंपामागील चाणक्य नेमकं कोण अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Breaking News)

ईडी, गडी आणि लांब उडी

गेल्या काही काळापासून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीकडून नेत्यांवर कारवाई केली जाते असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रात देखील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी भाजपवर हे आरोप केले आहेत. परंतु शिवसेनेत मोठं बंड झालं आणि एकनाथ शिंदे पक्षातील तब्बल 40 आमदार घेऊन वेगळे झाले. ते थेट मुख्यमंत्री बनले. त्यानंतर अजित पवार देखील पक्षातील बहुसंख्य आमदारांच्या पाठिंब्यासह थेट उपमुख्यमंत्री बनले. या दोन्ही नेत्यांनी बंड पुकारत लांब उडी घेतली. या दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांवर ईडी कारवाईची टांगती तलवर होती. त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला अशी देखील चर्चा आहे. असं असेल तर यामागील चाणक्य नेमकं कोण हे जाणून घेण्यासाठी सुज्ञ माणसाला फार विचार करण्याची गरज नाही. (Latest Political News)

कोणी टाकली गुगली अन् कोणाची विकेट?

भाजपला 24 मध्ये देशात पुन्हा सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात देखील 48 पैकी 48 जागा भाजपला मिळायला हव्यात असे आवाहन स्वत: अमित शाह यांनी केले होते. त्याचा एक प्रयत्न म्हणून तर ही राजकीय खेळी खेळली जात नाही ना अशी देखील चर्चा आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार केला तर तो सध्या विरोधातही आणि सत्तेत आहे. त्यामुळे कोण खेळी खेळतंय आणि ती कुणाकडून खेळून घेतली जातेय याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. तसेच 2019 प्रमाणे यावेळी नेमकी कोणी गुगली टाकली आणि कुणी कुणाची विकेट घेतली याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT