Maharashtra Political News: राज्याच्या राजकारणात आज मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (AJit Pawar) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज ते भाकित खरे ठरले असून अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी हा सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे.शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादीमध्येही (NCP) उभी फूट पडली असून अजित पवारांसह ४० आमदारांसह भाजप- शिंदे सरकारमध्ये सामिल झाले आहेत. मात्र या सगळ्या नाट्यमय घडामोडीत कुठेही न दिसलेल्या जयंत पाटील यांनीही आता त्यांची भूमिका जाहीर केली आहे. (Maharashtra Political News)
काय म्हणाले जयंत पाटील...
राजभवनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांची मांदियाळी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल असे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राजभवनात होते. या सगळ्या नाट्यात जयंत पाटील कुठे दिसत नव्हते.
त्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) नेमके कुठल्या बाजूला? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता. त्यावर आता जयंत पाटील यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे. मी साहेबांबरोबर.. असे ट्वीट करत त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे...
दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी पक्षाच्या मुख्य प्रतोद पद आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) सोपवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड अजित पवारांसोबत गेले नाहीत. ते अजूनही आमच्यासोबत आहेत त्यामुळे नवे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड असतील, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) पत्रकारांशी संवाद साधताना जाहीर केले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.