Balasaheb Thorat Statement : विरोधी पक्षनेते पद असताना अजित पवारांनी सत्तेत जाणं दुर्दैवी; बाळासाहेब थोरात

विरोधी पक्षनेते पद असताना अजित पवारांनी सत्तेत जाणं दुर्दैवी; बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam tv
Published On

सचिन बनसोडे

शिर्डी : विरोधी पक्षनेते पदासारखी महत्वाची जबाबदारी असताना अजित पवारांनी सत्तेत जाणं दुर्दैवी असून जनतेला हे बिलकुल आवडलेले नाही. सत्तेसाठी काहीही हे (BJP) भाजपचं घोषवाक्य असून दोन (Shirdi) दिवसांपूर्वी प्रधानमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि आज चित्र वेगळं बघायला मिळतंय. मात्र जनता हे सगळं बघत असून पुढचं यश आम्हालाच मिळणार याची खात्री असल्याची प्रतिक्रीया कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली. (Maharashtra News)

Balasaheb Thorat
Samruddhi Mahamarg Accident: झोप उद्या खुप काम करायचं; अपघातापूर्वी मोठ्या बहिणीचे तनिषाशी बोलणे ठरले अखेरचे

राज्यातील राजकीय भूकंपावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते पदाबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं देखील बाळासाहेब थोरात यांनी साम टिव्हीशी बोलताना स्पष्ट केले आहे. शरद पवारांशी आमची अद्याप चर्चा झाली नाही, मात्र होऊ शकते. त्यांनी बोलवलं तर एकत्र बैठक करू. पुढचं यश आम्हालाच मिळणार याची खात्री आहे.

Balasaheb Thorat
Mahesh Tapase News: अजित पवार भाजपसोबत गेले तरी फिकीर नाही; महेश तपासेंनी थोपटले दंड

महाविकास आघाडीला धक्का नाही

राज्यात एक वर्षापूर्वी हेच घडलं होतं. भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकतो हे पुन्हा एकदा समोर आलंय. लोकशाही आणि राज्यघटना जपली पाहिजे. विरोधी पक्षात राहणं अस्वस्थ करत असेल तर ते योग्य नाही. अजित पवार भाजपसोबत जाणं हा महाविकास आघाडीला धक्का नाही. जनता आमचा न्याय करील आणि प्रचंड मताधिक्याने विजयी करील. काहीही झालं तरी सत्ता आमचीच येणार, जनता आमच्या बरोबर आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत आम्हाला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलावे लागेल. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ; असेही त्‍यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com