Maharashtra Political Weather Update: राज्यात राजकीय भूकंप, राष्ट्रवादीत फूट, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी; दिवसभरात काय घडलं आणि पुढे काय घडेल?

राज्यात राजकीय भूकंप, राष्ट्रवादीत फूट, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी; दिवसभरात काय घडलं आणि पुढे काय घडेल?
Maharashtra Political Weather Update
Maharashtra Political Weather UpdateSaam Tv
Published On

Maharashtra Political Weather Update: आज राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडल्याचं पाहायला मिळालं आहे. पहाटेच्या शपथविधी झाला तेव्हा जितका धक्का बसला नसेल तितका मोठा धक्का आज शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे आणि काँग्रेसलाही बसला असेल.

आज राजकीय घडामोडी इतक्या जलद गतीने घडल्या आहे की, कोणाला विचार करण्याचाही वेळ मिळाला नसेल. कालपर्यंत शिवसेना आणि भाकप पक्षाविरुद्ध भूमिका घेणारे अजित पवार यांनी चक्क विरोधी पक्षाचा राजीनामा देत सरकारमध्ये सामील झाले आहेत. अशातच आज दिवसभरात नेमकं काय घडलं आणि पुढे काय घडू शकतं, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून होते नाराज

राष्ट्रवादी पक्षात अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशात आज दुपारी अजित पवार राजभवनावर दाखल झाले. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजभवानावर दाखल झाले. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

Maharashtra Political Weather Update
Sharad Pawar News : राष्ट्रवादीतील बंडखोरीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, पहिल्यांदा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो...

पटेल, भुजबळ, मुश्रीफ आणि मुंडे ही अजित पवारांसोबत

अजित पवार जेव्हा राजभवानावर दाखल झाले त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील होते. यातच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटीलमी, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि रामराजे निंबाळकर यांयासह राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील आमदार त्यांच्यासोबत होते.

अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी

शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, बाबूराव अत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादी पक्षात फूट

अजित पवार यांनी उपमख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वक्तव्य करण्यात आलं की, सरकारमध्ये सामील झालेल्या आमदारांना राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत पाठिंबा नाही. मात्र शपथविधी पार पडल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, पक्ष आमच्या सोबत आहे आणि यापुढील निवडणूकही पक्षाच्या चिन्हावर लढवणार.

डबल इंजिन सरकारला ट्रीपल इंजिन जोडण्यात आलं आहे; मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शपथविधीवर आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, ''कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिल्यावर अशा घडामोडी घडतात. आता डबल इंजिनच्या सरकारला ट्रीपल इंजिन जोडण्यात आलं आहे. अजित पवार अतिशय कर्तृत्ववान आहेत. त्यामुळे त्यांचे मी स्वागत करतो. या राज्याचा विकास आता अतिशय वेगाने होणार आहे. तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.''

Maharashtra Political Weather Update
Maharashtra Politics: मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड; राष्ट्रवादीकडून जाहीर

राज्यातील चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल : शरद पवार

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, ''अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांनी माझ्याशी संपर्क साधला. विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याबद्दल चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल'' पवार म्हणाले की, 'मला आनंद आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना शपथ दिली. याचा अर्थ यासंबंधीचे आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून पक्षाला, ज्यांच्याबद्दल आरोप केले होते त्यांना मुक्त केले. त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे'

विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी शुक्रवारी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. यातच आता मुख्य प्रतोद पद आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाडांवर सोपवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड अजित पवारांसोबत गेले नाहीत. ते अजूनही आमच्यासोबत आहेत, त्यामुळे नवे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड असतील, असं शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना जाहीर केलं.

पुढे काय घडणार?

अजित पवार यांनी आपण बंड केलं नसल्याचं सांगत पक्ष आपल्या सोबत आहे, असं म्हटलं आहे. मात्र शरद पवार यांनी याला आपला पाठींबा दर्शवला नाही. ज्याप्रकारचे २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीनंतर अवघ्या ४८ तासात आपले सगळे आमदार शरद पवार यांनी पक्षात परत आणले, तसेच आता पुन्हा एकदा घडणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यातच शरद पवार यांनीही मोठं वक्तव्य करत 'हे चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल', असं म्हणत सूचक विधान केलं आहे.

यातच आता राज्य सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री झाल्याने देवेंद्र फडणवीस यांची लवकरच केंद्रात वर्णी लागू शकते, अशा चर्चांना उधाण आलं आहे. यामध्येच आता शिवसेना शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्याची चर्चा आहे. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेतील कोणत्याही नवीन आमदाराला जागा देण्यात आलेली नाही. यातच पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडू शकतात, असं मत राजकीय तज्ज्ञांनी वर्तवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com