Jitendra Awhad
Jitendra Awhadsaam tv

Maharashtra Politics: मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड; राष्ट्रवादीकडून जाहीर

Maharashtra Politics: अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्याजागी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी करण्यात आली आहे.
Published on

Mumbai News: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अजित पवारांनी घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत ३५ ते ३६ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या भूमिकेने राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्याजागी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील राजकीय भूकंपावर पत्रकार परिषद घेतली. आव्हाड म्हणाले, 'शरद पवार हे निष्ठेला न्याय देतात. मी अन्याय अत्याचार आहे, तिथे उभे राहतो. माझ्या भूमिकेवर शरद पवारांचे प्रेम आहे. माझ्या मते राष्ट्रवादी नेते एकच आहेत. शरद पवारांचा पक्ष आणि निशाणी कोणी घेऊ शकणार नाही'.

Jitendra Awhad
Maharashtra Political Weather Update: राज्यात राजकीय भूकंप, राष्ट्रवादीत फूट, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी; दिवसभरात काय घडलं आणि पुढे काय घडेल?

'राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांकडे आहे. जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्ट निकालानुसार माझी प्रतोदपदी नेमणूक केली. त्यांना कारवाईची भीती होती तर बाजूला बसायचे होते. २५ वर्ष मंत्रिपद भोगले आहे. शरद पवार यांनी अजून काय देणार, घर देणार का? असा आव्हाड यांनी केला.

'ज्या नेत्याने मेहनत केली, फोन करून मंत्रिपद दिले. अशा माणसाला त्यांच्या या वयात अखेरचा काळ आहे, ज्या बापाने समृध्दी दिली, मान सन्मान दिला, अशा परिस्थितीत हे माणुसकीला शोभणारे नाही. मला कोणी विचारलं नाही, नाही ते माझं भाग्य. मी मेलो तरी पवार साहेब सोडणार नाही, असे आव्हाड पुढे म्हणाले.

Jitendra Awhad
Maharashtra Politics: राज्यातील चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल; शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष मोठा इशारा

दरम्यान, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद आणि विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली आहे. मात्र, विधीमंडळातील संख्याबळानुसार, काँग्रेसकडून विरोधीपक्ष नेतेपदी करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com