Maharashtra Politics: राज्यातील चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल; शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष मोठा इशारा

Maharashtra Politics: विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याबद्दल चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल,असे म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
Sharad Pawar Ajit pawar
Sharad Pawar Ajit pawarSaam TV
Published On

Sharad Pawar News: राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत काही आमदार आणि खासदारांनी देखील शिंदे-सरकारला पाठिंबा दिला आहे. या राजकीय भूकंपावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांनी माझ्याशी संपर्क साधला. विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याबद्दल चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल,असे म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

शरद पवार यांनी राजकीय भूकंपावर पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. काँग्रेसबद्दल होतं. राष्ट्रवादीबद्दल होतं. दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सांगत असताना तक्रार होती. त्यासंबंधीचा उल्लेख केला. हा जो उल्लेख केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या भ्रष्टाचारात सहभागी आहे असा जो आरोप केला.

'मला आनंद आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना शपथ दिली. याचा अर्थ यासंबंधीचे आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून पक्षाला, ज्यांच्याबद्दल आरोप केले होते त्यांना मुक्त केले. त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे', असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Ajit pawar
Raj Thackeray News: आज महाराष्ट्राचा ‘दिगू टिपणीस’ झाला; राज ठाकरेंची राज्यातील राजकीय घडामोडीवर मोठी प्रतिक्रिया

'दुसरा प्रश्न आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनी पक्षाची भूमिका त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. उद्याच्या ६ तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या आणि सर्व लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले होते. संघटनेत बदल करण्याचा विचार करणार होतो. पण उपस्थित केले गेले होते त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष म्हणून भूमिका मांडली, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Ajit pawar
Maharashtra Politics: 'पक्ष आमच्या सोबतच', अजित पवार यांचा दावा

'पक्षातील विधिमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याबद्दलचे चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल. ज्यांची नावे आली, त्यांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या .आमची वेगळी भूमका काय आहे, हे माझ्याकडे स्पष्ट केले. त्यांनी जनतेसमोर माडंलं तर माझा विश्वास बसेल, त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर वेगळा निष्कर्ष काढेल, असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com