Sharad Pawar News : राष्ट्रवादीतील बंडखोरीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, पहिल्यांदा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो...

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये असताना जलसंपदा विभागात घोटाळा झाल्याचा आरोप पंतप्रधान मोदींना केला होता.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

Mumbai News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या 35 आमदारांना सोबत घेऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवारांच्या भूमिकेनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काही दिवसापूर्वीच्या भाषणाचा दाखल देत त्यांचे आभार मानले.

शरद पवार यांनी म्हटलं की, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात राष्ट्रवादी पक्षातील काही नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये असताना जलसंपदा विभागात घोटाळा झाल्याचा आरोप पंतप्रधान मोदींना केला होता.

मोदींचे आरोप हे वास्तव नव्हते

राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आज शपथ घेतली. मला आनंद आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना शपथ दिली. याचा अर्थ असा की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून पक्षाला, ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त केले. त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला.

Sharad Pawar
Supriya Sule : अजित पवार आणि राष्ट्रवादीतील घडामोडींवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया...

अनेकांचे फोन येत आहेत

मला सर्वसामान्य जनतेवर, तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकांचे फोन येत आहेत. या सगळ्या स्थितीत आपण एक आहोत, आमची साथ तुम्हाला आहे. अशी मतं मांडतात. ममता बॅनर्जी, यांसह अनेक पक्षाचे नेत्यांचे फोन आले, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

आजचा प्रकार माझ्यासाठी नवा नाही

राष्ट्रवादी पक्षाची 6 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्याआधी काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली लवकरच समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते. त्यावेळी ज्यांनी पक्षाला सोडलं त्यापैकी काही जण सोडले तर सर्वजण पराभूत झाले, याची आठवण पवारांनी करुन दिली. (Political News)

Sharad Pawar
Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवारांची 18 वर्षांची खदखद अखेर बाहेर पडली; 2004 पासून नेमकं काय-काय घडलं?

मला चिंता नाही

माझा राज्यातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. जे घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला तर मी लोकांमध्ये जाणार. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेईल. राज्यात आणि देशात जेवढं पोहोचता येईल, लोकांशी संपर्क वाढवता येईल ते करेल, असंही शरद पवारांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com