.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मध्य रेल्वेकडून बुधवारी रात्री विशेष मेगाब्लॉक
टिटवाळा ते आसनगावदरम्यान ब्लॉकची घोषणा
४०० केव्ही लाइन कामासाठी पॉवर ब्लॉकची घोषणा
मध्य रेल्वेने बुधवारी रात्री विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा आणि आसनगावदरम्यान १८ आणि १९ मार्च (बुधवार/गुरुवार मध्यरात्र) रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या ब्लॉकमुळे काही एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून एमएसईटीसीएल द्वारे ४०० केव्ही लाइनच्या स्ट्रिंगिंग कामासाठी या मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे १८/१९.०३.२०२६ रोजी (बुधवार/गुरुवारची रात्री) टिटवाळा आणि आसनगाव स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' नॉर्थ ईस्ट मार्गांवर विशेष 'पॉवर ब्लॉक' परिचालीत करणार आहे.
कसा असेल ब्लॉक?
ब्लॉकची तारीख: १८/१९.०३.२०२६ (बुधवार/गुरुवारची मध्यरात्र)
ब्लॉकची वेळ: १९.०३.२०२६ रोजी ०२.१० ते ०२.५० वाजेपर्यंत
ब्लॉकचा विभाग: टिटवाळा आणि आसनगाव दरम्यानच्या अप आणि डाऊन एनई मार्गिका (स्थानके वगळून).
ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळेत बदल
ट्रेन क्रमांक 22104 अयोध्या- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसलाला वाशिंद येथे ०२.२७ ते ०२.५० वाजेपर्यंत नियमन करण्यात येईल. ही एक्स्रप्रेस गंतव्यस्थानी २० ते २५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 18030 शालिमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला आसनगाव येथे ०२.३७ ते ०२.५० वाजेपर्यंत नियमन करण्यात येईल. त्यानंतर ती एक्स्प्रेस गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 12810 हावडा -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसला आटगांव येथे ०२.३८ ते ०२.५० वाजेपर्यंत नियमन करण्यात येईन आणि ती गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
उशिरा धावणाऱ्या मेल/एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांबाबत, भविष्यात (नंतरच्या तारखेला) काही घोषणा झाल्यास, परिचालन सोयीनुसार त्या गाड्यांचेही नियमन केले जाईल. तसेच त्यांचा प्रवास शॉर्ट टर्मिनेटेड म्हणजेच गंतव्यस्थाना आधीच थांबवला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.