Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न मिळावं, पंतप्रधान मोदी यांच्याकडे कुणी केली मागणी?

ajit pawar on pm narendra modi : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळण्यासाठी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुण्यातील भुयारी मेट्रोचं उदघाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला ऑनलाइन स्वरुपात हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली. 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावं, अशी मागणी अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. आज शनिवारी अजित पवार यांनी नाशिकमध्ये जाहीर सभेत सांगितले.

नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा नाशिकमध्ये पार पडला जात आहे. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. या कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं.

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे

मी एवढा मोठा अर्ध पुतळा महाराष्ट्रात कोणाचाही पाहिला नाही. या स्मारकामुळे नाशिकच्याही लौकिकात भर पडेल.

मी काही चूक झाली का? हे शोधत होतो, मात्र मला चूक काही सापडली नाही. शिवछत्रपती, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं आपण राज्य चालवतोय.

भुजबळांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. या क्रांतिकारी दाम्पत्याचा वसा आपल्याला मिळाला आहे. तो पुढे न्यायचा आहे. शिव शाहूंच्या आंबेडकरांच्या विचारावरचं राज्यसरकार काम करत आहे.

१८८० मध्ये महात्मा फुलेंनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. समाधी साफ केली आणि फुले वाहिली. हे सर्व कागदपत्रांत आहे, त्यावरून बोलतोय. त्यानंतर त्यांनी पुण्यात शिवछत्रपती सोहळा देखील सुरू केला.

मी पंतप्रधान मोदी यांच्याकडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावं, यासाठी मागणी केली आहे.

दुधाने जीभ पोळली म्हणून लोक ताक देखील फुंकून पितात. मागच्या काळात काही घटना घडली. महापुरुषांचे पुतळे उभे करताना ते मजबूत असावेत, असाच विचार प्रत्येक जण करतो. मात्र काही कमकुवत विचारांचे लोक त्याचे देखील राजकारण करतात. त्यामुळे मी या पुतळ्याबाबत विचारलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

समाजातील भेद आणि विषमतेविरुद्ध, प्रवाहाच्या विरोधात जाऊन जग जिंकण्याचा काम फुलेंनी केलं. ही व्यवस्था मोडून काढत असताना अनेक अडचणी सावित्रीबाई यांनी सोसल्या. आज आमच्या महिला भगिनी सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. मोठ्या संघर्षानंतर भिडे वाडा मोकळा झाला. उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यात फुलेंच्या राष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी होतेय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१५ लाखांच्या अपूर्ण वचनासारखी फसवी ठरू नये, मोदींच्या योजनेवर युवकांच्या प्रतिक्रिया, काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: जालन्यातील बदनापुर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

Tesla Y Model : भारतीय बाजारात अवतरलेल्या टेस्ला कारचे भन्नाट फीचर्स; फीचर्स ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!

सून बाथरूममध्ये आंघोळ करत होती, सासऱ्यानं मागून धरलं अन् बेडवर ढकललं; सासऱ्याचा खरा चेहरा समोर

CM Devendra Fadnavis: वरळी दहीहंडीतून फडणवीसांचा हल्ला; पापाची हंडी फुटली, विकासाची हंडी लागेल|VIDEO

SCROLL FOR NEXT