Supriya Sule On Ajit Pawar Death Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: अजित पवारांचा घातपात झाला, रोहित पवारांच्या संशयावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...

Supriya Sule On Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या मृत्यूनंतर विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

Priya More

Summary -

  • रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले

  • अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला

  • रोहित पवारांच्या विधानावर आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली

  • आज दादा आपल्यात नाही हे खरं वाटत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या घटनेला होऊन १५ दिवस झाले. या अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केलाय. रोहित पवार यांनी अजित पवार यांचा तेरावा झाल्यानंतर जाहीर पत्रकार परिषद घेत घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी या पत्रकार परिषदेत अपघाताबाबत संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रतिक्रिया दिली. 'आमच्या सगळ्या बहीण-भावांचं दादासोबत चांगलं नातं होतं. आमच्या बॅचमध्ये एवढ्या लहान वयात दादा ज्या पद्धतीने गेला हे दादाचं जाण्याचं वय नव्हतं. इतक्या वर्षात दादाला कधी थकलेला, आजारी बघितलं नाही. आज दादा आपल्यात नाही हे खरं वाटत नाही.', असं म्हणत सुप्रिया सुळे भावुक झाल्या.

रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मोठं विधान केले होते. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शब्द दिला की, या सगळ्याची सविस्तर चौकशी करतील. रोहित पवारांची अस्वस्थता सहाजिक आहे. मुलांना असे वाटतं. त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. रोहितने अतिशय पारदर्शकपणे प्रश्न मांडले. रोहितने जे प्रश्न मांडले असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ते या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती घेऊन पारदर्शकपणे चौकशी करतील. त्यामुळे या चौकशीची वाट पाहूया.'

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री झाल्या. अजितदादा गेल्यानंतर त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'मी आणि सुनेत्रा वहिनी याआधीही डीपीडीसीला एकत्र होतो. सुनेत्रा वहिनींवर ही नवीन जबाबदारी आहे. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. पण अजितदादा नसल्याचे दु:खही आहे. सध्या माझ्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे. अजितदादा नसण्याचे दु:ख कधीच भरून निघणार नाही. आजही आम्हाला खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाही. आमचं कुटुंबं सध्या अडचणीतून जात आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री राष्ट्रवादीच्या नेत्याने रस्त्यावर टेबल टाकून केक कापला, फटाक्यांची आतषबाजी; मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update: तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिरात चोरी

पोलीस दलात खळबळ! ड्युटीवर जाणाऱ्या ASI ची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; नेमका वाद काय?

WhatsApp युजर्ससाठी गुड न्यूज! आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅटींग, जाणून घ्या सोपी ट्रिक

TCS धर्मांतरण प्रकरणी एमआयएमच्या नेत्याला पोलिसांची नोटिस|VIDEO

SCROLL FOR NEXT