rohit pawar on ajit pawar
rohit pawar Saam tv

अजित पवारांचा घातपात? रोहित पवारांनी सांगितली ७ कारणे, राजकीय वर्तुळात खळबळ

rohit pawar on ajit pawar : रोहित पवारांनी विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे. रोहित पवारांच्या संशयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Published on
Summary

अजितदादांचा घातपात झाल्याचा रोहित पवारांना संशय

रोहित पवारांनी दिली घातपाताची ७ कारणे

रोहित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी काही कारणे देत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. आमदार पवारांनी अजितदादांचा दौरा आणि विमान कंपनीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवारांच्या संशयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी रोहित पवारांनी ७ कारणे दिली आहेत.

आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहित पवारांनी अपघाताशी संबंधित विविध बाबींवर भाष्य केलं. यावेळी पवारांनी अपघाताची शक्यता असलेली कारणे देखील दिली.

काय कारणे दिली?

अजितदादांचा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे, पायलट बदलणे.

केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल, ATC Transcript, मधील वेळेच्या विसंगती

फ्लाइट रडार चा एक मिनिट आधीच बंद पडलेला.

डेटा > >व्हिसिबिलीटी कमी असताना लँड करणे.

रनवे ११ वर उतरण्याचा आग्रह

विमान कमी उंचीवर आणले जाणे मिनिटे पायलट एकही शब्द बोलला नसणे.

rohit pawar on ajit pawar
पॅन कार्डच्या नियमात होणार बदल; लाखोंचा व्यवहार करणाऱ्यांनी नियम जाणून घ्या अन्यथा नुकसान होईल

अजितदादांसोबत भेट झाल्यावर काय चर्चा झाली होती?

रोहित पवार म्हणाले, 'अजितदादांसोबत मी भेटलो. शेवटचे तीन-चार महिने भेट घेत होतो. अधिकारी, कर्मचारी चर्चा करायचो. चर्चा काय चालली होती. त्याबाबत राजकीय कन्सल्टंट - कंत्राट आहे. तो कॅन्सल करावा लागतो. त्यांच्याकडून काहीच मिळत नाही. त्यांनी राजकारण आम्हाला हे शिकवू नका, अशी चर्चा झाली होती'.

'अजित पवारांना बारामतीत लवकर जायचे होते. परंतु दादांना उशीर झाला. त्यानंतर अजितदादांना प्लान बदलावा लागला, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com