इराणचा नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव; युद्धविराम प्रस्तावावर चर्चा होणार की तणाव वाढणार?

Middle East Tensions: अमेरिकेनं सागरी नाकेबंदी केल्यानं इराणला मोठा आर्थिक फटका बसतोय. अशातच आता इराणनं युद्ध पूर्णपणे थांबवण्याची इच्छा व्यक्त केल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच की काय आता इराणनं अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवलाय. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट.
Middle East Tensions:
Iran proposes a 14-point peace plan as global attention turns to potential ceasefire talks with the US.saam tv
Published On
Summary
  • इराणने १४ कलमी शांतता प्रस्ताव सादर केला

  • अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड

  • सागरी नाकेबंदीमुळे इराणला आर्थिक फटका

रोहित कदम, साम प्रतिनिधी

इराण-अमेरिका यांच्यातील तणाव काही थांबायचं नाव घेत नाहीये. खरंतर ज्या होर्मुझ जलमार्गाचा वापर इराणनं ढाल म्हणून केला त्याच होर्मुझ जलमार्गाची नाकेबंदी करून अमेरिकेनं इराणची आर्थिक कोंडी केलीये. गेल्या तीन आठवड्यात अमेरिकेनं 40 हून अधिक जहाजे परत पाठवलीयेत.

Middle East Tensions:
Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका विश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

इतकंच नाहीतर अमेरिकेनं इराणच्या बंदरांची केलेली ही नाकेबंदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला दररोज 500 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसतोय. त्यामुळे तात्पुरत्या युद्धविरामाऐवजी युद्ध पूर्णपणे संपवण्याची इच्छा इराणनं व्यक्त केल्याचं बोललं जातंय. अशातच आता इराणनं अमेरिकेला युद्ध थांबवण्यासाठी 14 कलमी नवा शांतता प्रस्ताव दिलाय.

Middle East Tensions:
अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

इराणने आपल्या 14 कलमी शांतता प्रस्तावात अमेरिकेसमोर पुन्हा अटी ठेवल्या आहेत. ‘लेबनॉनसह सर्व युद्ध थांबवावं. तसंच, होर्मुझमधील नौदल नाकेबंदी हटवावी आणि संपूर्ण सैन्य मागे घ्यावं. एव्हढंच नाहीतर, इराणवरील सर्व निर्बंध हटवावेत आणि इराणची गोठवलेली मालमत्ता परत करावी. विशेष म्हणजे, युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई इराणला द्यावी’

यावर ट्रम्प यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने पाठवलेला नवा शांतता प्रस्तावावर लवकरच चर्चा होईल, असं स्पष्ट केलंय. पण हा प्रस्ताव स्वीकार केला जाईल की नाही, हे सांगू शकत नाही, कारण इराणने गेल्या ४७ वर्षांत माणुसकी आणि जगाचे जे नुकसान केले आहे, त्याची पुरेशी किंमत त्यांनी अद्याप मोजलेली नाही, असे खळबळजनक विधान ट्रम्प यांनी केले आहे.

त्यामुळे इराणच्या 14 कलमी शांतता प्रस्तावावर अमेरिका कसं प्रत्युत्तर देणार ? याकडे जगाचं लक्ष लागलंय. अमेरीका एक पाऊल मागे येणार का? आखाती देशातील तणावाची स्थिती कधी निवळणार ? याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com