Politics has heated up due to doubts raised by NCP leaders over Ajit Pawar's death saamtv
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

Ajit Pawar Death Row: अजित पवारांच्या मृत्यूच्या 5 दिवसानंतर दादांचा अपघात की घातपात. यावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच शंका उपस्थित केल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय भाष्य केलंय. पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • अजित पवारांच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी शंकांचं वादळ उठलंय.

  • राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच अपघात की घातपात असा सवाल उपस्थित होतोय.

  • अमोल मिटकरी व रुपाली ठोंबरे यांनी संशय व्यक्त केलाय.

ऐकलंत. अजित पवारांच्या मृत्यूला 5 दिवस झाल्यानंतरही शंकाकुशंकांचं काहूर थांबायला तयार नाही. आता थेट दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच प्रश्न उपस्थित केलेत. विमानाच्या स्फोटात बॉडी जळाल्या मात्र कागदं तसेच कसे राहिले,असा सवाल उपस्थित करत अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरेंनी घातपाताचा संशय उपस्थित केलाय.

दुसरीकडे अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असल्यानं त्यातून सत्य बाहेर येईल, असा आशावाद मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय. खरंतर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ममता बॅनर्जी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर खुद्द शरद पवारांनी समोर येत राजकारणाला ब्रेक लावला. आता अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येत आहे.

मात्र हे सगळं सुरु असतानाच दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राज्यातील सर्वसामान्यांच्या मनातील शंकांचं काहूर थांबायला तयार नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील शंका थांबवण्यासाठी सरकार उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देणार का? आणि दूध का दूध पानी का पानी करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: NCERT च्या विरोधात साताऱ्यात एल्गार, छत्रपती घराण्याच्या वतीने काढण्यात आला मोर्चा

Health Care: जेवणाआधी पाणी पिणे की जेवणानंतर? चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?

Bharat Taxi: ओला उबरला देणार टक्कर! 'भारत टॅक्सी' सेवा मुंबईत सुरु; किती भाडे द्यावे लागणार? वाचा सविस्तर

WhatsApp Recharge Feature: गुड न्यूज! आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाइल रिचार्ज; वापरायचं कसं? या स्टेप करा फॉलो

SCROLL FOR NEXT