Ajit Pawar on MVA Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar on MVA: महाविकास आघाडीला अपयश पचवता आलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला

Ajit Pawar Criticizes Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमचं सरकार म्हणत टीकास्त्र सोडत आहेत. विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत उत्तर दिलंय.

Bhagyashree Kamble

महायुतीच्या खातेवाटपानंतर नेते मंडळींनी राज्याचा कारभार हाकायला सुरूवात केलीय. राज्याच्या कारभारासाठी नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अॅक्शन मोडवर आले असल्याचं पाहायला मिळत आहे. खातेवाटपानंतर काही प्रमाणात नाराजी असली तरी मंत्रिपद मिळालेले महायुतीचे नेते अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. तर दुसरीकडे मविआचे नेते ईव्हीएमचं सरकार म्हणत टीकास्त्र सोडत आहेत. विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत उत्तर दिलंय.

बारामतीतल्या नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. तसंच महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 'महाविकास आघाडीला अपयश पचवता आलं नाही. ईव्हीएम मशीनवर काही नेत्यांनी संशय घेतला. कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून कोर्टात गेले'. असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

'महायुतीला जनतेनं आशीर्वाद दिला. काही वेगळ्या कारणामुळं शपथविधीसाठी वेळ लागला. सगळ्यांचं लक्ष शपथविधीकडं होतं. याबाबात वेगवेगळे आरोप विरोधकांकडून करण्यात आले. आम्ही कोणावर टीका करायची नाही असं ठरवलं होतं. आम्ही कामानिमित्त फिरत होतो, सगळ्यांना योजना सांगत होतो. विरोधक देखील कामानिमित्त फिरत होते. पण एवढं यश कधी आलं नाही', असंही अजित पवार म्हणाले.

३ मार्चपासून अर्थसंकल्प सादर करणार आहे. सगळ्यांना योजना बंद होणार नाहीत.आर्थिक शिस्त बिघडणार नाही, तसंच आर्थिक बाजू सांभाळून योजनांना पुढं घेऊन जाऊ. असं योजना आणि अर्थसंकल्पाबाबत अजित पवार यांनी माहिती दिली. तसंच पाच वर्षात रखडलेले काम पूर्ण करू, असं आश्वासनही अजित पवार दिले.

बीडमधील केस फास्ट ट्रॅकवर चालवा

'बीडमध्ये जी घटना घडली, अतिशय निंदनीय आहे. माजी सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आलीय. बीडमध्ये देशमुख कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणाचा मास्टरमाईंड कुणीही असेल, तर त्याला सोडायचं नाही. कितीही किंमत मोजावी लागली तरी चालले. केस फास्ट ट्रॅकवर चालवा' असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT