nagar ncp office, mla sangram jagtap, ajit pawar, sharad pawar saam tv
महाराष्ट्र

NCP vs NCP : राष्ट्रवादी भवन कोणाच्या ताब्यात राहणार? पवारांच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीची पाेलिसांत तक्रार

नगरच्या राजकारणात पुन्हा जूने राजकीय वैरत्व उफाळून येण्याची शक्यता.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार (ajit pawar) यांचा गट बाहेर पडल्यानंतर राज्यात सध्या शरद पवार (sharad pawar) यांच्या गटाच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटानेही आपापल्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मात्र यामुळे आता सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात दोन दोन पदाधिकारी अस्तित्वात आल्याने त्या त्या ठिकाणचे कार्यालये कोणाच्या ताब्यात जाणार यावरून धूमचक्री उडत आहे. (Maharashtra News)

नगर शहरातील सध्या राष्ट्रवादीचे दोन शकले असून शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्हीही अस्तित्वात आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (mla sangram jagtap) यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला.

त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी अजित पवार गटामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी नगर शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी केली होती.

त्यांच्या जागी पूर्व श्रमीचे राष्ट्रवादीचे असणारे मात्र मध्यंतरी शिवसेनेत गेलेले माजी महापौर अभिषेक कळमकर (abhishek kalamkar) यांना नगर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जयंत पाटील (ncp leader jayant patil) यांनी नियुक्ती केली.

त्यानंतर अजित पवार गटाच्या वतीने प्राध्यापक माणिक विधाते (manik vidhate) यांची नगर जिल्हा शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (nagar ncp) मोठे कार्यालय असून हे राष्ट्रवादी भवन कोणाच्या ताब्यात राहणार यावर चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी राष्ट्रवादी भवन मध्ये जाऊन आपल्या नावाची पाटी त्या ठिकाणी लावली.

अभिषेक कळमकर यांच्यावर एनसी दाखल

प्राध्यापक माणिक विधाते यांच्या नावाची पाटी काढून टाकली त्यामुळे या ठिकाणी वादाची ठिणगी पडली असून अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी याप्रकरणी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात अभिषेक कळमकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादी भवन मधील आपल्या नावाची पाटी आणि इतर पाट्या तोडून टाकल्याची तक्रार विधाते यांनी दाखल केल्यानंतर पोलिसांनी अभिषेक कळमकर यांच्यावर अदखल पत्र गुन्हा दाखल केला आहे.

राजकीय वैराची पुन्हा चर्चा

नगर शहरात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मानणारा मोठा वर्ग असून जगताप म्हणतील तीच पूर्व दिशा असते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणी जाणार नाही असे असतानाच अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेतून अचानक राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि शहर जिल्हाध्यक्षपद पटकावले.

या आधीही जगताप आणि कळमकर यांचे राजकीय वैर नगर शहराला माहित आहे. त्यामुळे आता हे वैर पुन्हा एकदा नगरच्या राजकारणात नगरकरांना पाहायला मिळणार आहे अशी चर्चा रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT