asaduddin owaisi Saam tv
महाराष्ट्र

एक दिवस हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल; खासदार औवेसींचा दावा

Indian union parliament : एमआयएमचे खासदार औवेसी यांनी मोठा दावा केलाय. एक दिवस हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल, असा दावा केलाय.

विश्वभूषण लिमये

खासदार असदुद्दीन ओवैसी हे सोलापूर दौऱ्यावर

असदुद्दीन ओवैसी यांचं पंतप्रधानावर पदावर मोठं भाष्य

असदुद्दीन ओवैसी यांची अजित पवारांवरही टीका

ऐन महापालिका निवडणुकीत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सोलापुरात प्रचाराला आलेले एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एक दिवस भारतात हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान होईल, असा दावा केलाय. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एमआयएमने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी स्वत: महाराष्ट्रातील विविध महापालिकेत प्रचारासाठी उतरले आहेत. खासदार ओवैसी यांची आज सोलापुरात सभा होती. या सभेत देशाच्या पंतप्रधानावर मोठं भाष्य केलं.

खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, 'आपण सोलापूरला पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोक इथं इतक्या वर्षांपासून आहेत. काहीच करत नाही. पाकिस्तानच्या घटनेत लिहलंय की एकच समाजाचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो. त्यामुळे एक दिवस असा येईल, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. तो दिवस बघण्यासाठी की कदाचित जिवंत नसेल, पण हा दिवस एक ना एक दिवस येईल'.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणातील मुद्दे

एमआयएम गरिबांमुळे सुरु झाली. त्यामुळे गरिबांसाठी काम

करते.

कोणी तरी म्हटलं की माझ्या शेरवानीला हात लावणार, छेडखानी करायची नाही.

तुमचा जो राजकीय बाप आहे, अजित पवार त्यांना माझ्यासमोर बसायला सांगा.

तीन मिनिटांत मुका नाही, केलं तर सांगा. मी देशाच्या संसदेत बोलणारा आहे.

अजित पवार हे नरेंद्र मोदीच्या गोदीत बसलेत. अजित पवार यांना व्होट म्हणजे मोदी यांना व्होट.

अजित पवार यांना व्होट म्हणजे मोदींनी आणलेल्या वकफ कायद्याला समर्थन

अजित पवार यांना दर्गा, मशिदीचे काही घेणेदेने नाही, आपल्याला आहे.

मोदी, शिंदे, अजित पवार ही त्रिमूर्ती ही एकच आहेत

तुमच्यासमोर येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील य त्यांना मटपेटीतून उत्तर द्यावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT