Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : खासदार असदुद्दीन ओवैसी यांना मोठा धक्का; प्रदेश कार्याध्यक्षांनी दिला पदाचा राजीनामा

Maharashtra Political News : खासदार असदुद्दीन ओवैसी यांना मोठा धक्का बसला आहे. प्रदेश कार्याध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

विश्वभूषण लिमये

महाराष्ट्रात असदुद्दीन ओवैसी यांचं टेन्शन वाढलं

राज्यात एमआयएम पक्षाला बसला मोठा धक्का

एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांनी दिला पदाचा राजीनामा

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने कंबर कसली आहे. मागील नगरपरिषदांच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने चांगली कामगिरी केली. त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांनी पक्षाच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला आहे.

एमआयएम पक्ष राज्यभरातील काही भागात धडाकेबाज कामगिरी करत आहे. मुस्लिम बहुल भागात एमआयएम पक्षाचे उमेदवार बाजी मारताना दिसत आहेत. मात्र, याच पक्षाचं एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांच्या राजीनाम्याने टेन्शन वाढलं आहे. इम्तियाज जलील यांच्या नंतर फारुख शाब्दि हे एमआयएमचे राज्यातील दुसरे मोठे नेते आहेत. (Maharashtra Political News)

फारुख शाब्दि यांनी सोलापूर (Solapur) शहर मध्य विधानसभेतून दोन वेळा निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही वेळेस फारुख शाब्दि हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. त्यांच्याकडे सध्या सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष अशा जबाबदारी होत्या. मात्र पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे शाब्दि यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

जालन्यात एमआयएमकडून ८ उमेदवार जाहीर

जालन्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ चालू असताना जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएमने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

आतापर्यंत जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएमच्या जिल्हाध्यक्षासह ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा एमआयएमने केली आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून तीन उमेदवार , प्रभाग क्रमांक 4 मधून 2 तर प्रभाग क्रमांक 10 मधून 2 आणि प्रभाग क्रमांक 15 मधून 1 उमेदवाराची घोषणा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवासात २५ मिनिटे वाचणार, मिसिंग लिंकचं काम पूर्ण, या दिवशी होणार सुरू

कामाची बातमी! मुंबईहून पुणे अन् कोल्हापूरसाठी विशेष रेल्वे, वाचा वेळापत्रक अन् थांबे

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महापौर पद भाजपकडेच राहण्याची शक्यता

Pune Accident : दीड वर्षापूर्वी लग्न, आता अपघातात मृत्यू, पुण्यात एसटी बसने उड्डाणपूलावर राजाला उडवले

IND vs NZ: श्रेयस की इशान, तिलक वर्माच्या जागी कोण खेळणार? सूर्याने २ वाक्यात विषय संपवला अन् कारणही सांगितलं

SCROLL FOR NEXT