नागपूर एम्समधील त्वचारोग विभागातील समृद्धी पांडे हिने आत्महत्या केली.
समृद्धी ही सीआरपीएफचे डीआयजी कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला
समृद्धी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती
पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी
AIIMS Nagpur PG Student Samruddhi Pandey Found Dead : केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डीआयजी कृष्णकांत पांडे यांच्या मुलगी समृद्धी हिने नागपूरात गळफास घेऊन आयुष्याचा दोर कापला. समृद्धी पांडे ही नागपूरातील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी तिची मैत्रीण कॅालेजला गेली असता तिने फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे.
सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. तिने तणावातून आयुष्याचा दोर कापल्याची माहिती समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी तणावात होती. समृद्धी त्वचारोग विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती , ती अभ्यासात हुशार असताना तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सोनेगाव पोलीस करत आहे. यापूर्वी सुद्धा ऑगस्ट महिन्यात वैदकीय अभ्यासक्रमाला असणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली होती..
समृद्धी ही नागपूरमधील एम्समध्ये त्वचारोगशास्त्राच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. समृद्धी पांडे ही आयपीएस अधिकारी कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे. ते सध्या पुण्यात सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून तैनात आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले असू शकते.
समृद्धीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत असलयाचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. समृद्धीला त्रास का झाला असावा हे जाणून घेण्यासाठी पोलिस आता तिच्या मैत्रिणी आणि वर्गमित्रांची चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.