Ahmednagar Accident Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Accident: दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने ४ वारकऱ्यांचा मृत्यू, अपघातातील मृतांची नावे आली समोर

Ahmednagar Road Accident: अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे, अहमदनगर

Ahmednagar Road Accident:

अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही वारकरी जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक-पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातातील मृतांची नावेही समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती. कंटेनरला चालकाला डुलकी लागल्याने त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर हा कंटेनर थेट दिंडीमध्ये घुसला. या अपघातात ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर ८ वारकरी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


या अपघातातील जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या वारकऱ्यांवर उपचार सुरु आहेत. संगमनेर तालुक्यातील घारगावात अपघात घडला आहे. शिर्डीतून आळंदीकडे जाणाऱ्या पायी पालखीचा अपघात झाला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे.

तत्पूर्वी, घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी , प्रशासनाला केल्या. त्यानंतर त्यांनी तातडीने मदत पोहोचवली.

या अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांची नावेही समोर आली आहे. या अपघातात बाळासाहेब अर्जुन गवळी, बबन पाटीलबा थोरे, भाऊसाहेब नाथा जपे, ताराबाई गंगाधर गमे अशी मृतांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Rasta Roko : पैठण- संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; ओला दुष्काळ जाहिर करत सरसकट मोबदला देण्याची मागणी

आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, महाराष्ट्र पुन्हा हादरला!

PCOS misconceptions: PCOS विषयी महिलांच्या मनात असतात 'या' गैरसमजुती; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Central Government Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवळीचं गिफ्ट, महिन्याच्या पगाराइतका मिळणार बोनस, वाचा पात्रता अन् अटी?

SCROLL FOR NEXT